Snehal Bhaurjare
Quote by Snehal Bhaurjare - लग्न म्हणजे काय असतं
कधी रूसणं तर कधी समजवण असतं
तो चिडला तर तिने शांत राहायच
कपातल्या वादळाला चहाबरोबर 
संपवायचं असत

लग्न म्हणजे काय असतं
दोन कुटुंब अन दोन जीवाचे मिलन असत
एकाच विस्कटलं तर दुसर्याने सावरायचं
संकटातल्या वादळाला 
दारातच थांबवायच असत

लग्न म्हणजे काय असतं
प्रेमाचं ते बधन
अन  घराच घरपण असतं
विधात्याने निर्माण केलेलं
एक सुंदर नातं असतं
       
स्नेहल डोंगरे - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments