Ashish Jadhav profile
Ashish Jadhav
31 2 1
Posts Followers Following
Lahari Kavi
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav -  हिशोब कर्माचा होणार आहे..



नकोस करू तू चिंता फळाची, 
परीक्षा सत्याची रोज होणार आहे..
नाही दिसले जरी कोणास तू श्रमताना,
हिशोब खऱ्या कर्माचा वरी होणार आहे..
                           - आशिष A. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - 

खरंय..

खरंय की रात कालची,
न दिस आजचा सोसण्यात आहे,
वदलो खरे तर,
चंद्राला सूर्य रोज दावण्यात आहे,

थकलो आहे इतकाच की,
हाडं स्नायूंच्या परीक्षा घेण्यात आहे,
उमगत नाही इतकेच की,
आयुष्य पुस्तकाच्या कोणत्या पानात आहे..
                                               - आशिष A. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - मैत्री..

श्रीकृष्ण-सुदामाची जोड,
श्रीकृष्ण कोण हा जर प्रश्न आहे,
"मैत्री" हेच
त्यास उत्तर आहे..

                    - आशिष A. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - जिंकेन मात्र..

तुटलो असतो कित्येकदा,
रुष्ठ दैव गिळताना,
खरंच कुणी जर असतं,
मागे वळून पाहताना..

तुटलो जरी नाही,
झटलो मात्र आहे लढताना,
रोज हरेन एकदा,
जिंकेन मात्र युद्ध संपताना..

              - आशिष a. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - श्वास दे..

वचनाचा हात नको,
सोबतीची साथ दे..
उसवलेल्या नशिबाला, 
ठीगळीची आस दे..

रखरखत्या उन्हाला,
सावलीची शाल दे..
युद्ध असे रोजचे अन् 
दमलो की श्वास दे..
                                        -आशिष a. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - वेळ..

दुनिया स्वार्थाची,
येईल विकायला त्यांची वेळ,
पण किंमत तिची पैसा नाही,
आहे फक्त आपली वेळ..

                     - आशिष a. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - प्रीत कंठास दाटले,
अक्ष दर्शना आसले,
श्रोत स्वरांचे भासले,
मर्म तुझ्यास बांधले..

अर्थ सुखांस हारले,
स्वस्थ क्षणांस त्यागले,
व्यर्थ साजणी का सारले,
स्वर्ग धरतीस जरी आणले..

         - आशिष a. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - आई..

मावेल का गं सर्व, 
लिहिलं मी किती जरी,
उरेन का गं मी, 
काहीजरी करून तरी..

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - नजर मिळताच नजरेला,
पापण्या नयनांच्या लाजल्या कश्या,
चाहूल माझी येताच,
घायाळांच्या कळया खुलल्या जश्या..
                      
                      - आशिष अ. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - सांगू काय हृदया, सावरली कुठे ही धडधड,
ऐक सांगतील जे, श्र्वासांची खाल-वर,
मिटता ना मिटे, माझीया मनाची घर-घर,
भान हरपते सखे, पाहताच तुझं क्षणभर..
                               
                                   - आशिष अ. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - लबाडीचा संगतीला दुनिया बोंबांची जंगी आहे,
नी इमानीच्या दरबाराला  जनांची खऱ्या मंदी आहे,
चकाकी जरी राती दिसे वावड्यांची,
                    उजेडात कुठे सिद्धीला त्यांच्या संधी आहे..                    
                                                 - आशिष अ. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - तू शीतल चांदणी,
मी होणारा बंड या क्षणी,
धगधगत्या तनाला,
आठवण तुझी शहाळाचं पाणी,

गर्तेत हारलेल्या भावनांच्या,
कारण तू जिंकण्याचं रणांगणी,
साथ तूच येता,
बदलीन मी सारी कहाणी..
                                     - आशिष अ. जाधव - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - अर्थाविण परमार्थ..

अर्थाविण परमार्थ जसे निरर्थ,
भावविण उद्देश्य होईल व्यर्थ,
तुका म्हणे,
नको मिथ्य सुखांसाठी जठील शर्थ,
सत्यचि आहे आणि राहील अनंत.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - कलम की नोक..

कलम की नोक उठा चला,
सोचा उसने,
लीखूं कूछ मै भी थोडा बुरा भला,
चलने लगा तो आया सामने स्याही का पोटला,
उसने पूछा क्या लिखेगा,
दिमाग कहां है लिखने वाला..

कहा उसने,
युंही नहीं सजते कागज पे पंक्तीयों के अक्षर,
उतरते है आस्मां के तारें शायर के बस सोच लेने पर,
फिर ठहरते है लफ़्ज़ एक दुजे को टटोल कर,
उंगलिया फिरतीं हैं फिर सजाने महफिलों के मंजर.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 1 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - माधवा..

जर जयाचे कर्म तयाचे पदरी,
जगतात कसे हे राक्षस दरिद्री,
कारण दे आता येण्यास मंदिरी,
राख अश्या वृत्तीची लागुदे किनारी..

नजर नजरेला वाळीत जाते,
आत्मा देहांचा वास त्यागते,
पुरुष म्हणायची लाज वाटते,
जेव्हा कर्म तयांचे शीर गाठते..

कौरव किती कोण जाणे, 
जरी एकटीच ती संकटात,
का नाही आलास तू कृष्ण बनुनी,
घोर अंधारी या कलयुगात..

आहे अस्तित्व ना तुझे,
मग घडते कसे असे जगात,
काय सांगशील तिला,
जेव्हा येईल ती तुझ्या दारात..

©Ashish Avinash Jadhav
#lahari_expresses_here - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - माधवा..

कौरव किती कोण जाणे, 
जरी एकटीच ती संकटात,
का नाही आलास तू कृष्ण बनुनी,
घोर अंधारी या कलयुगात..

आहे अस्तित्व ना तुझे
मग घडते कसे असे जगात
काय सांगशील तिला 
जेव्हा येईल ती तुझ्या दारात..

© Ashish Avinash Jadhav
#lahari_expresses_here - Made using Quotes Creator App, Post Maker App
7 likes 3 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - नजरेला नजर वाळीत जाते,
आत्मा देहाचा वास त्यागते,
पुरुष म्हणायची लाज वाटते,
जेव्हा कर्म तयांचे शीर गाठते..

© Ashish Avinash Jadhav
@lahari_expresses_here - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - देवा..
जर जयाचे कर्म तयाचे पदरी,
जगतात कसे हे राक्षस दरिद्री,
कारण दे आता येण्यास मंदिरी,
राख अश्या वृत्तीची लागुदे किनारी..

© Ashish Avinash Jadhav
@lahari_expresses_here.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - उमलून पाकळ्यांचा..

उमलून पाकळ्यांचा गंधास ही इशारा,
स्वप्न वेल घडीचा मोत्यास का शहारा,
आतुरले पंख कधीचे, तरी सैर भैर हा वारा,
मृदुल दव पालव्यांचे श्रावणास हा बहारा..

भ्रांत ढगांची दाटवून रिमझिम सरींच्या धारा,
चिरतरुण रुप वनांचे ठेविल्या लोचणी साऱ्या,
प्रश्न हे कड्यांचे अविरत होत होते,
त्यास उत्तर हे नभाचे, पैलतीरि जिवांस न कळणारा..

©Ashish Avinash Jadhav
@lahari_expresses_here.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - संघर्ष माझ्या अस्तित्वाचे,
माझं काही चुकलं का ?
गोष्टीत माझ्या मी शहाणा, 
मन मात्र तुमचं दुखलं का ?

ताठ कणा मोडला नाही, 
म्हणून शीर इर्षेची ओढली का ?
गाणं माझ्या आभाळाचं, 
गातो माझाच मी, तरी सूर माझे खुपले का ?

वाटेत या चालतो, चालत चालत पळतो, 
पळताना धडपडतो, धडपडून उठतो,
आणि उठून परत चालू लागतो,
युद्ध माझ्या अंतरीचे, मग जग बाहेरच जळलं का ?

©Ashish Avinash Jadhav
#lahari_express - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - काळीज तू माझं कळवटून पिळलं..



मीठ अळणी आहे माझं, हे क्षणोक्षणी कळलं,
जेव्हा आपलेपणाच फळ परकेपणाने गिळलं,
ऋत वसंताचं वादळात विरलं,
जेव्हा काळीज तू माझं कळवटून पिळलं..

©Ashish Avinash Jadhav
#lahari_expresses_here - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - उत्तराची घाई..

उत्तराची घाई आहे कोणाला,
नजरेतला ओलावा हूनच व्यक्त झाला,
रंग तो गालाचा ओळखून मी घेतला,
भावना लाजाळूंच्या समजल्या मला..


© Ashish Avinash Jadhav
#seasonal_lahari_ - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - आई..

प्रथम प्रवास जीवाचा आरंभ करुनी,
जन्म देई लेकरा परमकोटी यातना सहूनी,
घालवे जन्म अवघा, जाणे कोणती माया उरी त्या धरुनी,
परी काळजी ना मिटे तिची श्वास जरी संपूनी,

ना कोणती साथ, ना इवलीशी आस मनी,
पाऊल कशी ग टाके तू एवढी खंबीर होऊनी,
काय अहंकार आहे तुला पुरुषा,
जर सृष्टी निर्मितीस नेमला तीस स्वयम् शंभूनी,

लिपल्यास तू भिंती, टिपलेस गळते पाणी,
भागवलीस भूक तू नन्ह्या ताण भूक हरूनी,
अस्तित्व सारे झिजले कायाची र्हास करुनी,
मागितलेस ना तू सौदे कसलीच आस धरुनी,

चुकलो जरी आई परी घेतलेस तू पदरी,
नाही लायकी माझी जरी उरलो सर्व करुनी,
कोण मी नाव लाऊ, जर आहेस तू कणोकणी
कर उपकार पुन्हा, मलाच उदरी घेऊनी....

© Ashish Avinash Jadhav
#seasonal_lahari_here - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - माझी तुझी..

ऋत वसंताच्या श्रावणी अलगद पावलं माझी तुझी, 
मौन वाहिनी शी उभी ओली गाठ माझी तुझी, 
सांज राती विजल्या वाती साथ काजव्यांची माझी तुझी,
शीतल किनारी लाट भरतीची माझी तुझी..

© आशिष अविनाश जाधव
#lahari_writes_here.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - कोलाहल..

कोलाहल मनाची मी सांगू कुणा
पर्व वणव्यांची मी डागु कुणा
रीत सुखांची आहे दुःखांच्या अंती
तोवरी घुटमळत्या श्र्वासांची ऱ्हास मी बांधू कुणा..

© आशिष अविनाश जाधव
#lahari_writes_here - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - लेक माझी..

लेक माझी बापाच्या मनाचा हळवा कोपरा
अलगद ओसंडून वाहणारा जणू  निर्मळ झरा
दिसभर थकल्यावर बाबा.. म्हणून धावणारी निरागस कोकिळा
आपल्याच आवेशात वावरणारी गोंडस माझी अप्सरा

इवलिशी पावलं आणि घरभर करी नखरा
आलीस कुठून ग तू या कमनशिबी बापाच्या पदरा
काळीज तू माझं न आईच्या मनाचा व्यस्त किनारा
काय करू नी काय नको ग तुझ्यासाठी माझ्या लेकरा..

खळखळ तुझं हसणं नी खट्याळ तुझ्या नजरा
धडपडणं तुझं जणू माझ्याच आठवणींचा सदरा 
नसणं तुझं बिंबवते तुझ्याविना मी किती अपुरा
नाहीस ना जाणार सोडून कधीच या जिवलग बापाचा आसरा

आई तुझी देऊळ नी बाप उडालेला झोपडा
पाहिजे तूच लेक मला जरी लोटल्या किती संवत्सरा
गाईल्या अंगाई, जोजवील्या राती किती साऱ्या
चांदोबा गेला सागरी, नीज आता तू माझ्या गोजिऱ्या..

© आशिष अविनाश जाधव
#lahari_writes_here_ - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - दुबळ्या मना..

काय वाटते रे मना..
ठरवूनी हे तू घडवितो पुढच्याच क्षणा,
नसते काहीच आपल्या हाती करितो अपेक्षांची विटंबना,
विणले सर्व ते जाळे त्यानेच तर ना रे दुबळ्या मना

साचवूनि सारी माया खिशात, 
जाणले सर्वस्वी जणू आपणांस,
व्यर्थ रे तो सारा अट्टाहास,
जरी सुविधांची आहे  इत्यंभूत आरास

आकाश, पृथ्वी, हवा, पाणी, 
भूतलावरी हर एक पक्षी आणि प्राणी
ओविले एकसंध हे सारे 
जणु मोतीयांचेच मखमली मणी..

समजू नकोस ईश्वर निर्जन शरीरा
इच्छा त्याचीच लागते, हृदयी ऊर्जा संचाराया
टाकून दे तो अहंकार, घाल शीर्ष खाली
सोड दिनांची पाठ, देव आहे त्यांची स्वारी..


© आशिष अविनाश जाधव
#lahari_writes_here - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - बाप व्हायला लागत, खरंच बाप कळायला..

पहाट स्वप्नांच्या आलात तुम्ही भेटायला,
अंधार वनी काजवे बनून जागवायला

धाय मोकलूनी रडलो मी, वाट शब्दांना मोकळी करायला,
मारली तुम्ही घट्ट मिठी, जिवंतपणीची माया जागवायला

म्हणलात मला दे आठवण आईला,
कसं सांगू तिला, बाप आला स्वप्नी, काळीज पिळवटायला

सांगू कोणाला देवा, कसा असतो बाप,
बाप व्हायला लागत, खरंच बाप कळायला..

© आशिष अविनाश जाधव
@#_lahari_writes_ - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - बाबा...

लागला वेळ जरासा मला माझाच बाप व्हायला, 
तुम्ही अर्धी सोडलेली नात्यांची वेल हळुवार गुंफायला

आता क्षणोक्षणी कळतं बाप नसतो केवळ पैसा कमवायला,
त्यालाही मन असतं स्वतःचंच मन जपायला 

रोज वाटतं दौडवाव हे मन स्वच्छंदी जगायला,
परत आठवतं नाही राहिला आपला बाप मागे सर्व सांभाळायला..

© आशिष अविनाश जाधव
@#lahari_writes_ - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - अंधार जीवनी माझीया पैंजण पावलं तुझी,
शीतल किनारी कोमलशी गुणगुण तुझी,
अनंत विचारांती रचली जणू चंदन काया तुझी, 
कोवळ्या उन्हात, मृदुल यौवनात निसर्गाने केली जशी शिफारस तुझी... 

© आशिष अविनाश जाधव
#Lahari_express_here - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Ashish Jadhav
Quote by Ashish Jadhav - null - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 1 comments