स्वप्नवेडी profile
स्वप्नवेडी
36 7 1
Posts Followers Following
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - 
ओळख नजरेतली...
शब्द वाट पाहत असताना ओळख नजरेतून घडली 
पहिलं झलक तिची जनु डोळ्यात राहिली 
नजरेतून ओळख, हळूच रुजली,
हृदयात कुठेतरी भावना फुलली।

ती समोर आली, तो क्षण थांबला 
ठोका हृदयाचा हळूच बदलला।
जणू पावसाच्या पहिल्या सरीसारखी,
प्रेमाची चाहूल अलगद गवसली।

दोघेही स्तब्ध, शब्द नव्हते काही,
तरी संवाद मनाचा चालूच राहिला।
हात न धरता, मन जुळून गेले,
ओढ अनोखी नकळत उमटून गेले।

सांगता आलं नाही, तरीही समजलं,
नाव एकमेकाचं हृदयात उमटलं।
सुरुवात होती, ती प्रेमाची खरी,
पण ती वेड्या मैत्रीची गोड वाटचाल भारी। - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - "स्वप्नातली भेट"

तिच्या मनात होते खूप प्रश्न, 
सतत त्याच्याच विचारात होती ती मग्न 
त्याचं नाव न घेताही, 
रोज त्याच्याच होत होता भास

चंद्रही विचारतो रात्री, 
"अजूनही विसरली नाहीस का?" 
ती फक्त हसली , 
न काही सांगता शून्यात पुन्हा ती हरवली..

त्याची भेट झालीच नव्हती कधी, 
पण मनाने कितीतरी वेळा एकत्र होते ते दोघं 
वाटा तुटल्या जरी 
तरी नकळत त्या कुठे तरी उरल्या 
कितीही ठरवलं तरी 
भेटी फक्त स्वप्नातच घडल्या

अधुरं काही पूर्ण नकोसं झालं 
जेव्हा या मनानेच त्यागाच्या वाटे कडे पाहिल 
कारण अधुरेपणातच 
जपली जाते ती भावना खास, 
मला माहित नाही कधी सुटेल का हा 
स्वप्न भेटींचा वनवास 
पण मनी एक आहे आस 
की कधी तरी मिळेल 
तिला तिच्या स्वप्नांचा निवास....



 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - प्रश्नाला उत्तर – हो की नाही???

तो काही बोलला नाही
आणि तीही...
पण त्या शांततेत 
संपूर्ण संवाद घडून गेला

त्याच्या नजरेत प्रश्न होता
तिच्या नजरेत उत्तर...
पण दोघांनीही टाळलं बोलणे 
कारण सत्य ऐकायच नव्हत खरंतर

विरुद्ध दिशांना चालत राहिले दोघे,
पावलांना एकमेकांची ओळख असतानादेखील...
वेडाहून गेले दोघेही,सहवास ही वेडावला,
 मन थांबायला सांगतं, 
पण हृदय मात्र प्रेमात गुंतलेलं असतं.
न स्वीकारण हा होतो गुन्हा 
जेव्हा सवय लागते एकमेकांना

म्हणूनच,
काही गोष्टी फक्त मनातच उसळतात 
उत्तर असूनही समोर त्या अदृश्य दिसतात 
म्हणूनच हृदय होते कासावीस 
कारण त्याच्या खोल रुतलेल्या आठवणीस 
मिळाला नाही कधी न्याय
जाता जाता अडखळते पाऊलही  
उत्तर देता देता हरवतो प्रश्नही 

मिळेना उपाय काही 
प्रश्नाला उत्तर हो की नाही???
अडकुनी या द्वंद्वात 
अपूर्ण  राहिले हे संवाद.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - त्याची सावली....

भासावी सावली त्याची समुद्र किनारी
सुचवी तिला एखादी शायरी

नजरेत हळवी झळकते कहाणी
मनात घुटमळते ओळखीची एक वाणी
स्पर्श न झालेलं, पण जाणवलेलं
नातं कुठे तरी खोल गुंतलेलं

लाटा उगाच का उसळतात पुन्हा
जुन्या आठवणींनी येऊन केला गुन्हा
शब्दात न मावणारं हे नजरेतलं अंतर
जणू सांगतं, "तो क्षणच होता खरंच सुंदर..."

भासावी सावली त्याची समुद्र किनारी
उगाचच पुन्हा, सुचते तीच शायरी...

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
10 likes 2 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - मूक भावना.......
मनातलं त्याला सांगायचं होतं, 
पण शब्द येईनात ओठांवर
 डोळ्यातल्या भावना वाचेल का तो?      
की समजूनही सोडून देईल?

त्याचं अस्तित्व होतं जवळ, 
पण त्या नात्याला अर्थ नव्हता ठळक 
तरीही मन गोंधळत गेलं,
 त्या शांत नजरेत हरवलेल नकळत

मी थांबवले पाऊल स्वतःचे, 
त्याने स्वप्नातही न रेखटाव चित्र माझे
कारण त्याला द्यायची नव्हती खोटी आशा,
तरी मन मात्र शोधत होतं त्याच्याच प्रेमाची भाषा - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 2 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - हरवलेलं आयुष्य

हरवलेलं आयुष्य आता आता सापडत आहे,
धूसर झालेलं स्वप्न पुन्हा स्पष्ट दिसत आहे.
गेलेल्या वाटा, थांबलेले क्षण,
माझ्या नकळत कुठेतरी मनात जपले गेले होते पण...

माझ्यातली ' मीच' मला आता सापडत आहे,
आरशात पाहताना एक नवा चेहरा दिसत आहे.
जे हरवलं होतं काळोखात,
ते उजेडाच्या स्पर्शात आता पुन्हा फुलत आहे.

ओळखतेय आता हृदयातली शांत साद,
श्वास घेते आता नव्या विचारांच्या गाभाऱ्यात.
मनाच्या गाभाऱ्यात शांततेचं गाणं गूंजतंय,
नकळत स्वतःशीच नव्याने नातं जुळतंय.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 2 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी -         माझं नसणं तुझ्यात होतं.....


मी तुझ्या शब्दांत नव्हते,
पण तू जेव्हा शांत होतास…
तेव्हा मी तुझ्यात होते.

मी प्रकाश नव्हे,
पण अंधारातलं एक नीरव अस्तित्व आहे.

तू शोधलं नाहीस मला,
पण तरीही… मी तुझ्यातच होते.
श्वासात, आठवणीत, हरवलेल्या क्षणांत.

मी तुझं उत्तर नाही…
पण एक भावना आहे,
जी सांगता येत नाही 
फक्त... जाणवते.

मी एक छाया आहे 
तुझ्या आतल्या शून्यातली शांत सावली.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - त्याच्यात हरवलेली ती

त्याच्यात हरवलेली ती, 
नाही तिला कशाचे भान, 
त्याच्या स्वप्नांत रंगत होती, 
जणू मिळाले नवे आभान.

सोबत त्याच्या चालताना, 
रस्तेही मोहरून गेले,
 पावलांच्या त्या तालामधून, 
स्वप्नांचे सूर जुळून गेले.

नकळत डोळ्यात त्याच्या,
स्वतःचे प्रतिबिंब ती शोधू लागली 
असताना सोबत तो 
स्वतःलाच विसरू लागली...





 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 2 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी -  - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 2 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - अबोल प्रेम...
त्यानं फक्त एकदा पाहावं,
तिने हसून खाली बघावं,
त्या लाजण्याच्या नजरेतून,
सगळं प्रेम व्यक्त व्हावं.

शब्द न बोलले तरीही,
गप्प राहूनही समजलं,
की हृदयाच्या स्पंदनांनी,
एकमेकांशी काहीतरी सांगितलं.

वार्‍यासारखं हलकं भासावं,
सावलीसारखं सोबत असावं,
नकळतच त्या नजरभेटीत,
आयुष्य सगळं बांधून घ्यावं. - Made using Quotes Creator App, Post Maker App
9 likes 4 comments

Explore more quotes

स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी -  मैत्री की प्रेम?

ही आहे मैत्री की प्रेम,
मनाला पडलेय कोडे,
तुझ्या नजरेत शोधताना,
स्वतःलाच हरवलेले थोडे.

तुझ्या बोलण्यात ओलावा का?
का आहेत हळवे भाव?
मैत्रीच्या गोड प्रवासातून,
का उमलतात प्रेमाचे भाव?

तूझ्या डोळ्यात 
काहीतरी दडलंय,
मैत्रीच्या नावाखाली,
काहीतरी अनोळखं जपलंय.

कधी मैत्री, कधी प्रेम,
हा गुंता सोडवायचा कसा?

देशील का उत्तर हा गुंता सोडवावा कसा??? - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 2 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - "खूप सुंदर दिसतेस"
हे फक्त त्याच्या तोंडून ऐकून
शहारली होती ती,
तिचे मृगनयनी डोळे
लाजिरे झाले होते.

तिच्या डोळ्यांची हिंमतच नव्हती
त्याच्याकडे बघण्याची,
ओठांवर अलवार हास्य,
हृदयात मात्र वादळ उसळले होते.

तो मात्र तिच्या या रूपाकडे
स्तब्ध होऊन पाहत होता,
त्या लाजऱ्या गोजिरवाण्या चेहऱ्यात
स्वप्नांचे प्रतिबिंब शोधत होता.

त्याच्या नजरेतला तो भाव
तिला सुखावून गेला,
क्षणभर का होईना,
तिला स्वप्नातील परीसारखं वाटायला लागलं.

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - उसकी मोहब्बत को कैसे मैं बेवफाई का नाम दूं...
बस, उसकी खामोशी को उसकी सफाई मान लूं...

अगर जेहर ना होता उसके पापा के हाथ में...
तो आज मेरी मोहब्बत होती मेरे साथ में...

तूम्हारे पास आना हैं वो मुझसे केह न सकी,
और मुझसे बढ़ती दूरी भी वो सेह न सकी...

कल डोली सजने वाली थी उसकी,
पर हाथों पर मेहंदी उसने खून से सजाई...

और बारात दरवाज़े पर आने से पहले,
मौत उसके दरवाज़े पर आई...

एक हमेशा गिला रहेगा...
जाते वक्त तू साथ क्यों नहीं ले गई...
तेरी मोहब्बत की वजह से मेरी  मोहब्बत भी अधूरी रह गई...


अब टूटता तारा देखकर कैसे दुआ करूं अपनी मोहब्बत के लिए...
जो मेरी मोहब्बत के लिए खुद इस आसमान का सितारा बन गई...

अपने सारे ख्वाब उसकी कब्र पर सजाकर आया हूं...
पता नहीं अब कब तुझसे मिल पाऊंगा...
पर फिर टूटता तारा दिखे, तो अगले जन्म में भी सिर्फ तुझे चाहुंगा...

बहुत सारी शिकायाते हैं तुझसे...
एक दिन ज़रूर बताऊंगा...
मिले हम अगर कहीं आसमान में...
तो तुझे मैं ज़रूर सताऊंगा...

"याद रखना"
एक दिन तुझपे हक जताने ज़रूर आऊंगा... - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहताना
जीव झाला कासावीस
प्रश्न करुनी तुझ्या अश्रूंना 
मीच झाले त्यांचे उत्तर
का नियतीनं खेळ मांडला 
त्याच्या अश्रूमध्ये असावे माझेच नाव
मी अनभिज्ञ राहिले यापासून
परंतु नाही पुसू शकले त्याचे अश्रू - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - स्वप्न पाहिले होते तू सोबत असण्याचे 
पण त्या स्वप्नांना कुठे माहित होते की 
तुझ्या स्वप्नात तर कोणीतरी दुसरेच आहे. - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - प्रेम.....
प्रेम म्हणजे नजरेचे संवाद 
प्रेम म्हणजे नकळत असणारी ओढ
प्रेम म्हणजे न बोलताही समजलेले मन
प्रेम म्हणजे शक्ती
प्रेम म्हणजे विश्वास 
प्रेम म्हणजे फुलातील सुगंध 
प्रेम म्हणजे एक भावना.... - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - तू पाहावं म्हणून मी नटले 
पण 
तुझ पाहणं माझ्यासाठी नाहीच आहे 
कळते तेव्हा 
या नटण्याला काही अर्थ उरलाच नाही
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - लिहता तुझ्याबद्दल 
शब्दांची जागा
घेतली अश्रूंनी
का त्यांचा अट्टाहास 
मनातले शब्द थांबवण्याचा
तूच तर जबाबदार त्यासाठी 
कारण ह्या अश्रुंमध्ये 
आहे फक्त तुझेच नाव
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - जिने मला लिहले
तिच्याबद्दल मी काय लिहावं?

❣️Happy Mother's Day ❣️ - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - जे मनाला पटतं ते बुध्दीला कधीच पटत नाही
जे बुध्दीला पटतं ते मनाला कधीच स्वीकारायचं नसतं  - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments

Explore more quotes

स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - Just believe on GOD!!! - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - ज्याच्यावर ईश्वराची नजर असते
 त्याला कधीच कोणाची नजर नाही लागत. - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - धूसर झालेली स्वप्न होतील का खरी?
 तू सोबत नाही हे माहित असताना...
पुन्हा फुटतील का पंख त्या स्वप्नांचे?
ते पंखच छाटलेले असताना...
आकाशी झेप घेतली का ते पुन्हा?
त्यांना बांधून ठेवलेलं असताना...

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - स्वतः एकटे पडताच
वाटे जग हे चालले
माणुसकीच्या अंताकडे... - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - नसे या विश्वात वडीलांसारखा देवमाणूस कोणी!!! - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - तुझा विचार करता करता मीच माझी राहिले नाही
आता मी स्वतःलाच कसा विचारू प्रश्न 
येशील का तू परतूनी ?
प्रश्न ही लाजेल असे तुझे व्यक्तिमत्त्व
फक्त मलाच का ते नाही कळले तुझे व्यक्तिमत्त्व.... - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 1 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - तुला बघताच मन का हे होई सैरभैर
किती समजावले मनाला तरी ते तुझ्याच मागे पळे 
तुला बघताच क्षणी नसे माझे मन माझेच
का तू असा माझ्या मनालाच तुझ बनवून घेई 
सांग ना का माझ मन होई तुझे ??? - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - आपण कोणाच्या आनंदाचे कारण नाही बनले तरी चालेल पण
 कोणाच्या दुःखाचे कारण मात्र आपण बनायचं नाही.... - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - नसे माझ्या मनात कोणी 
असे फक्त तू
वेळ ही जीवघेणी
सोबत नसे तू
खोटी नसतात प्रेमाची नाणी
माझ्या नाण्यात असे फक्त तू
कृष्णाचे रूप सुंदर,श्यामल
त्यात दिसे मला फक्त तू
नसे अपेक्षा माझी काही
पण प्रेम मात्र तुझ्यावरच राहील

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप असतील
पण चांदण्यांसाठी चंद्र मात्र एकच असतो. - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments

Explore more quotes

स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - तू माझ्यात राधेचं रूप पाहतोस का माहित नाही 
पण मी मात्र तुझ्यात कृष्णाचचं रूप पाहिलं आहे - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी -  अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
साथ फक्त तुझीच हवी
  - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - हक्क देशील का मला 
तुझी सावली होण्याचा? - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःला
 खोडता आलं पाहिजे. - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - काही व्यक्ती आयुष्यात भेटतात...
ते कधीही परत न भेटण्यासाठी... - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
स्वप्नवेडी
Quote by स्वप्नवेडी - बाहेरचं जग कसं आहे 
हे नाही माहिती मला
पण माझ्या स्वप्नातलं जग 
मात्र खूप सुंदर आहे 
तू माझा व्हावास 
हा अट्टहास नाही
पण...
माझ्या स्वप्नातल्या जगात मात्र 
तूच असशील!!! - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments