Amogh Apte profile
Amogh Apte
970 19 2
Posts Followers Following
कुछ लिखने की कोशिश करता हूँ तखल्लुस में अपना नाम "पहल" लिखता हूँ
Amogh Apte
Quote by Amogh Apte -  "अलक"
पोलीस "एsss चल बस गाडीत कुठे चाललीस रात्री?"
एक माता "नाही साहेब माझी मुलगी लहान आहे तिला सोडून आले आहे ती घरी एकटीच आहे मला जाऊ द्या " पोलीस "नाही नाही आता तुला यावेच लागेल माझ्या सोबत चल लवकर"  
पोलीस " अगं बाई घाबरू नकोस मला आपल्या मोठ्या भावासारखाच समज मी सोडतो तुला घरी "
सगळेच पोलीस सारखेच नसतात माणूसकी जिवंत आहे अजून.
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - बोलायला झाला उशीर तरी, हरकत नाही 
मी खरं प्रेम केलंय तुझ्यावर, काही गंमत नाही 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - ना पत्ता भक्ताचा ना कोणी पुजारी 
हे देह एक मंदिर अन् मी भिकारी 
इथे फक्त वसतो तो आत्माच नित्य आहे 
जाणत्या अजाणत्या भावनाच विखारी 
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 1 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - कोणीच देणार नाही 
भरोसा, गर्भार यौवनाचा 
ही ओढ, हे आकर्षण 
हा सारा भाग आहे मिलनाचा 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " घनव्याकुळलेला "
थरारणाऱ्या भावनांचा कल्लोळ, मनात माजलेला 
सावल्यांचा आभासी खेळ, चांगलाच आहे रंगलेला 

एकेक उलगडून झाली, आवर्तने मनातली
तरीही हा बिचारा दिल, अजूनही आहेच भंगलेला 

कागदांचे तुकडे हजार हजार करून झाले 
शब्दात नशीबाच्या आहे, मी तसाच बांधलेला 

झाल्या चुका काही, हातूनी अपराध नाही केला 
शिक्षा अशी दिलीस तू की, त्राणही नाही उरलेला 

श्वासातल्या विरहाचा क्षण, हळवा झाला कोपरा 
तुटतो जीव जेव्हा, स्वर तेव्हाच येतो घनव्याकुळलेला 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - तळ्याच्या काठावर शांत शांत वाटतं 
पण कुणी खडा टाकला ना पाण्यात 
की, मन ढवळून निघतं
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - समजून घेणं आणि 
समजावून सांगणं 
ह्या दोन्हीतला फरक 
लक्षात यायला 
आयुष्य सरून जातं 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte -  प्रत्येक गोष्ट सांगण्याचे 
 मी आजकाल टाळतो कारण _ 
तुझ्या प्रत्येक श्वासाचा अर्थ 
आता मला चांगलाच कळतो
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - करू नये कधीच आठवणींचा कोंडमारा 
मनातल्या मनात उगाच नसता पसारा 
त्रास होतो ना! गं ! मग मनाला बिचारा 
सावरायला वेळ लागतो आणि एक किनारा 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " असं जगणं व्हावं "
आता नाही काढायचं मला 
असं अस्ताला गेलेल्या सूर्यासारखं आयुष्य 
बेभान होऊन जगलोय मी 
आणि तसंच जगेन बेधुंद होऊन 
फडफडत्या दिव्यापेक्षा 
कडाडणारी वीज म्हणून क्षणभरच जगेन 
आता नाही रडायचं मला 
असं मुळूमुळू एखाद्या स्त्री सारखं कधीच 
गडगडाटी हास्य हसलोय मी 
आणि तसंच हसेन आसवे पिऊन 
एक अश्रू होण्यापेक्षा 
पावसाचा थेंब होऊन बरसेन 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Amogh Apte
Quote by Amogh Apte - सवाल वेडे अन् भावनाही वेड्या 
शब्द शब्द ओघळताना कामनाही वेड्या 
काळीज वेडे नि यातनाही वेड्या 
डोळ्यातून पाझरताना वेदनाही वेड्या 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - वाचला सवाल तेवढा 
घडलेल्या घटनांचा 
खेळ उगाच मांडलेला 
तू हा भावभावनांचा
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - नको घालूस तू फुकाच्या आणाभाका 
मी काही गोडव्याला प्रित केली नाही 
नको देऊस तू कोणत्याही विवंचना 
तुझ्यावर मी कधी प्रित लादली नाही 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - श्वासातल्या विरहाचा देऊ कसा हवाला 
व्यर्थ आसवे गाळणार नाही मी अभिषेकाला
गेलो जरी प्रिये मी तुझ्यापासूनी दूर 
तू आजही भिडतेस सखे माझिया काळजाला 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - तुझ्या स्पर्शाच्या ओढी पेक्षाही 
मला माझे आईवडिल महत्वाचे 
तू ती जबाबदारी घेशील?
तू नाही तर कोणी तरी असेलच ना 
जो माझ्या आयुष्यात येऊनही 
त्याच्या आणि माझ्या 
आईवडिलांची जबाबदारी घेईल 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - जीवनप्रवास 
कोणत्या सुखाचा शोध घेऊ 
जीवन हा एक प्रवास आहे 
शरीरातील भावनेला आता 
नाही उरला आभास आहे 
यातनांच्या किनाऱ्याला समांतर 
जीवनप्रवास संकटांचा 
वेदनेच्या गाभाऱ्यातील
हा खेळ संचिताचा 
शेवटाच्या मार्गावरती फक्त 
तुझाच एक ध्यास आहे 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - अनसुलझे रिश्तों से क्या मिलना 
बेमतलब की बातों से हमें सरोकार नहीं 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - दग़ाबाज़ दिल है बेचारा 
लेकिन लफ़्ज़ों में धोखेबाज़ हम नहीं 
गुनाहगार ही सही मैं तुम्हारा
पर शतरंज के मोहरों की तरह चालबाज हम नहीं 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " ओठांशी जुळताना "
मंद हळव्या शब्दांच्या पलीकडले 
नाते तुझे नि माझे गहिवरलेले
जिथून सुरू होते ही चांदरात 
तिथेच तू मोगरा माळते केसात
धूंद सुगंधाने मन माझे बावरलेले 
कस्तुरीचा देह, रंगकांती गुलाबी 
अशी मनात माझ्या, तुझी मोहक छबी 
गात्र गात्र झाले, माझे सारे नशिले 
ये ना जवळ अशी, हातात लपेटून हात
जे आहे तुझ्या मनात, तेच होईल प्रत्यक्षात 
ओठ ओठांशी जुळताना, राहील लाजलेले 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - दिल को इतना भी मजबूर मत कर पहल 
की वो उसकी उंगलियों पर नाचने लगे 
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments

Explore more quotes

Amogh Apte
Quote by Amogh Apte - चराग़ सारे बुझा दो पहल क्योंकि,
यहां पर इश्क़ अंधा होता है 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - "बालपणीचे क्षण"
ते बालपणीचे दिवस पुन्हा कधीच येणार नाहीत 
जसे मी जगलो तसे आयुष्याचे क्षण 
बहुतेक पुन्हा कधीच अनुभवणार नाही 
होतो मी माझ्याच विश्वात गुंतलेला
आनंद माझा मित्रमैत्रिणींमध्ये लपलेला
तो, तसा आनंद, पुन्हा कधीच लाभणार नाही 
होते रेssss हेवेदावे पण त्यातही एक गंमत होती 
जरी असतील ना रूसवेफुगवे पण,
त्यालाही वेगळीच किंमत होती 
आता पैसे देऊनही ते दिवस काही दिसणार नाही 
माझ्या बालपणीच्या आठवणीच राहतील 
पण, ते क्षण पुन्हा कधीच परतणार नाही 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - ' निट नेटके '
येईन मी घेऊन प्रेम 
माझ्या ओंजळीत मावतील तितके 
विश्वासाच्या नात्याने,
सोबतीला पुरेसे आहे इतुके 
नाही उगाचचा फापटपसारा 
नाही अजिर्णाचे उमाळे 
पोट भरण्यापूरतेच पाहिजे 
जे जे लागेल ते ते जितके 
येईन मी घेऊन स्वप्ने 
जी खरोखरीच पूर्ण होतील 
फालतू दिवास्वप्नांच्यापेक्षा 
आपल्या मोजक्याच 
गरजा भागतील 
आणि राहू शकू आपण 
अगदी निट नेटके 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - शब्दांचे मनोरे नकोत 
मुक्या वचनांची शपथ तुला 
भावनेच्या ओलाव्याशी
मी आहे ना! जपत तुला 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - भास आणि आभास 
फरक फार थोडा आहे 
फक्त एकाच श्वासाचा
अर्थ केवढा आहे ?
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - बेभरवशाचा स्पर्श नको 
एक ठाम विश्वास पाहिजे 
संसार सुखाचा करण्यासाठी 
आधाराला आभास पाहिजे 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - तरूण रात्रीला, तरूण यौवनाची
तरूण स्पर्शाला गरज आहे ,
मोहणाऱ्या तुझ्या तरूण मनाची 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - कातर कातर ओठांना 
स्पर्श कातर ओठांचा 
कातरवेळी जपेन मी 
भाव तुझ्या वचनांचा 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - रहूंगी मैं सदा आलम-ए-बरजख़ में, तेरा इंतज़ार करती हुई 
चाहें बुझा दो तुम चराग़ सारे फ़िर भी रहेगी, एक शमा यूँ हीं जलती हुई 
_"पहल" अमोघ 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 4 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - लकीरों में मुक़द्दस है अल मकतूब तेरा आशियां 
शाख-ए-जड़ से कोई जुदा हो नहीं सकता 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Amogh Apte
Quote by Amogh Apte - "जरी पुरुष असलो तरीही...."
असावे माझ्याही हाती 
ओंजळभर मोती ,
असे घरभर उधळायला 
लागावे सहजच 
मीही खुळेच हसायला 
रूसावे मीही कधीतरी उगाच 
काही कारण नसताना 
मनवावे तू ही मला मग,
हलकेच कुशीत घेताना 
लाजावे मीही थोडेसे 
उघडे नागडे होतांना 
आणि तेव्हाच पाहावे 
तू मला आंघोळ करताना 
मलाही वाटते असेच काही 
जरी पुरुष असलो तरीही,
एक स्त्री असते म्हणतात 
पुरूषामध्ये लपलेलीही 
_"पहल" अमोघ 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - नाजूक पण तरीही कणखर, थोडंसं हक्काचं एक घर
नातं असतंच असं बहिणभावाचं, हळवं आणि सर्वात सुंदर 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - ख्वामखाह ही गिनती हो तुम सुबह की धूप 
रातों के अंधेरे में रौशनी छिपाऊं कैसे?
आख़री मुकाम में धुआं धुआं बन जाती है ज़िंदगी 
भरी जवानी की चाशनी जताऊं कैसे?
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - कुछ तिनके तिनके थे जो बिखरे हुए 
चुन चुन कर जमा करने की कोशिश कर रहा हूँ
छोटे छोटे से अपने ख़्वाबों को ,
अंखियों में सिमटने की कोशिश कर रहा हूँ
फटी पुरानी सी है यह ज़िंदगी कैसी हाय
मद्धम मद्धम रोशनी में थोड़ी सी ,
अपनी भी क़िस्मत चमकाने की कोशिश कर रहा हूँ
निंद खाली पेट नहीं आती पता है 
मुक़द्दर आज़माते आज़माते हुए ,
ज़हन में वो सुकून तलाशने की कोशिश कर रहा हूँ 
बवालों से घिरा हुआ रहता हूँ मैं सदा ही 
रातों के जवाबों में सयाना एक 
सवाल ढूंढने की कोशिश कर रहा हूँ 
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त 
म्हणजे दिवाळी पाडवा 
तुमच्या आयुष्यात 
असाच राहो गोडवा 
दिवाळी पाडवा आणि 
बली प्रतिपदेच्या
हार्दिक शुभेच्छा 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - सुखसमृद्धी, धनधान्य, आणि किर्ती 
आपल्या धनत्रयोदशीच्या घड्यात ,
अशी नेहमीच राहो भरती 
हीच तर आहे खऱ्या दिवाळीची महती 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - ताटव्यातली फुलं ओंजळीत घेतांना 
मन आनंदाने भरून येतं ती ,
गणपती बाप्पाच्या चरणी वाहताना 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - गूढतेचा अर्थ 
स्मशानात समजतो 
भूत भविष्य आणि 
वर्तमानाचा 
तिथेच खरा 
साक्षात्कार होतो 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - येथे समस्त अपूर्णता पूर्ण होते अस्मिता 
माणूस येतो आणि जातो फक्त रिता 
देव मागत काहीच नाही तो फक्त दाता 
कौसल्येचा रामच आहे सर्वांचा त्राता 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - हुंकार आणि ओमकाराचा 
जिथे आहे संचार 
तिथे नष्ट होऊन जातो ,
सारा अहंकार 
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Amogh Apte
Quote by Amogh Apte - काळजीचं काही कारण नाही 
सगळं व्यवस्थित होईल 
मी आहे ना सोबतीला तुझ्या 
आता सर्व सुरळीत होईल 
हाच मानसिक आधार देणारं 
असावं कोणीतरी आपलसं वाटणारं 
म्हणजे खरंच सगळंच छान 
आणि जीवन सुगंधीत होईल 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " आठवांचा प्रवास "
ये ना रे सख्या जवळ आणखी थोडा 
माझ्या देहाची कात नवीन आहे आता 
लाव ना रे लगाम तारूण्य आहे फुललेले 
मनातील हे चांदणे पुन्हा आहे बहरलेले  
मोगरा हा सुगंधीत पुन्हा तरुण आहे आता 
शांत कर रे निवांत कासावीस ह्या जीवाला 
तुझ्या स्पर्शाची भाषा समजून घेऊ दे मनाला 
मी आजही तशीच उभी  सजून आहे आता 
चंद्र जागलेल्या रात्रींची याद येते तुझी 
मलाही आठवांची भाषा कळते रे तुझी
त्या आठवांचा उल्हास जपून आहे आता 
_"पहल" अमोघ 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - बावन्न पत्यांचा डाव ,
राजा एकच चौकटीतला 
एक्क्याचेच जास्ती वर्चस्व ,
पण, मान मात्र 
बदामाच्या राणीला 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - थोड़ी सी जगह मेरी भी है 
इन लफ़्ज़ों के दरमियान 
एक वजह यह भी शायद 
अपने रिश्ते की बुनियाद 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - मोह मोहाच्या धाग्यात 
क्षण क्षण हळवे साठवून मनात 
तू येशील का परत? प्रिये
पुन्हा नव्याने माझ्या जीवनात 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - देह कस्तुरी, गात्रं मोगरा 
सुगंधाचा ठेवा सख्यांनो, 
जरा जपूनच वापरा
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " स्मरण "
स्मशानात वास्तव्य, रहस्यमय जीवन 
चिताभस्म सर्वांगाला, मोक्षाचे कारण 
धूर धूर जळून देह, खाक होते माती 
उर भरून फुटताना, राख होते छाती 
विमुक्त होऊन, गळून पडते आवरण 
चिताभस्म सर्वांगाला, मोक्षाचे कारण 
घोर माया, तिची अघोर आहे सिद्धी 
रूद्राक्षांची माळ, पांथस्थ होई रिद्धी 
नवजन्मासाठी होते, आत्म्याचे जागरण 
चिताभस्म सर्वांगाला, मोक्षाचे कारण 
अंतिम सत्य मृत्यू, कशाला भीती मरणाची 
मरणाशिवाय नाही, सांगता ह्या जीवनाची 
असावे सदा चित्ती, त्या भगवंताचे स्मरण 
चिताभस्म सर्वांगाला, मोक्षाचे कारण 
_"पहल" अमोघ 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - हायकू 
शांतता भंग 
वादळाची चाहूल 
वाजे मृदंग 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " तलाश "
न जाने कहाँ खो गई है मुस्कुराहट मेरी 
एक वजह ढूँढ रहा हूँ थोड़ा-सा मुस्कुराने के लिए 
जाने कहाँ हो गया है लापता तेरा साया 
वो गिरह ढूँढ रहा हूँ तेरे साथ होने के लिए 
दूर कहीं छिपीं है शायद मेरी परछाई पहाड़ों में 
ऐसी जगह ढूँढ रहा हूँ आराम फरमाने के लिए 
न जाने कितने कोहीनूर चुरा लिये गये थे यहाँ से 
वहीं चमक ढूँढ रहा हूँ अपनी क़िस्मत चमकाने के लिए 
चली गई है शायद मेरी रूह मेरे बदन से अलग 
ख़ुद को ढूँढ रहा हूँ थोड़ा-सा रूमानी होने के लिए 
_"पहल" अमोघ  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Amogh Apte
Quote by Amogh Apte - " एकच तत्त्व "
एकच तत्त्व आहे जगात 
एकच सत्व साऱ्यांच्या रगात 
नरनारी नारायण अंगांगात 
एकच स्त्रोत आहे ब्रम्हांडात 
एकच मार्ग ह्या तिमिरात 
शक्तिस्वरूप नारी एकच प्रकाशात
एकच ज्ञान तुझ्या ध्यानात 
एकच प्राण आपणा सर्वात
विश्व शक्ति तू नारी त्रिकालखंडात 
एकच ध्यास ठेऊनी मनात 
एकच श्वास भरूनी हृदयात 
विलीन मीच होतो पंचमहाभूतात 
_"पहल" अमोघ 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes