Nandkishor Bhingardive profile
Nandkishor Bhingardive
6 0 0
Posts Followers Following
Nandkishor Bhingardive
Quote by Nandkishor Bhingardive - आपली कहाणी 
आपणच लिहायची 

थोडी तू लिहायची 
थोडी मी लिहायची
जमेल तशी लिहायची 
हळूहळू लिहायची 
पण लिहायची 

आपली कहाणी 
आपणच लिहायची 

नंदू बी.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Nandkishor Bhingardive
Quote by Nandkishor Bhingardive - (काल एका वृध्दाश्रमाला भेट दिल्यावर लिहिलेल्या या काही ओळी...)

तेल संपून गेल्यावर सुध्दा 
वात त्याची जळत आहे 
माहीत नाही हा दिवा आता 
कुणासाठी झुरत आहे 

कधी काळी त्याने ही दाखवला होता
प्रकाश आणि दिसल्या होत्या वाटा तुला 
त्या विसरलेल्या वाटेवरून आता, तू पुन्हा 
एकदा परतण्याची, तो वाट पाहात आहे 
माहीत नाही हा दिवा आता 
कुणासाठी झुरत आहे 

अडकला तो जीव त्याचा, देह सुटता 
सुटत नाही, तुझ्या-माझ्या जगातही 
आता, आपल असं कुणी, हे उरतच नाही 
उरला प्रवास आता, तो एकटाच करणार आहे 
माहीत नाही हा दिवा आता 
कुणासाठी झुरत आहे 

...नंदू बी.

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Nandkishor Bhingardive
Quote by Nandkishor Bhingardive - एकदा का रिकाम्या पोटाची भूक भागली 
की, माणसाला दुसऱ्या भूका लागू लागतात 
आणि मग सूरू होतो त्या भागवण्यासाठीचा
एक नवा आणि जीवघेणा खेळ....


..नंदू बी. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Nandkishor Bhingardive
Quote by Nandkishor Bhingardive - मतदान करताना फक्त "या"दोन गोष्टी आठवा.. 
एक म्हणजे, शाळेत शिकवलेली लोकशाहीची व्याख्या..
लोकांनी..लोकांसाठी..लोकांमार्फत.. चालवलेले राज्य म्हणजे.."लोकशाही"
आणि दुसरी म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावरील प्रतिज्ञा...भारत माझा देश आहे..
बाकी आपण सगळे सुज्ञ आहातच
मतदान करताना फक्त डोळे, मेंदू आणि मन उघडं ठेवा, काही प्रलोभानासाठी स्वतःला विकू नका..
आणि हो... मतदान करण्यापूर्वी, जरा मागील, करोनाचा कठीण काळ सुध्दा आठवा. त्यावेळी तुम्हाला "खरी मदत" ही कोणी केली होती ते,शेवटी माणसाचं माणसाच्या कामी आली

 लोकशाही टिकवा.. लोकशाही वाचवा..
भारत माता की जय.. वंदे मातरम् 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Nandkishor Bhingardive
Quote by Nandkishor Bhingardive - माझ पाहिलं गुलाब जपून 
ठेवलेल्या त्या पुस्तकाला,
कालच पाहिलं मी,
तिन त्या रद्दीत भरताना 





..नंदु बी. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Nandkishor Bhingardive
Quote by Nandkishor Bhingardive - मैत्री मध्ये..
"आम्ही" आणि "आपण" वरून 
"तू" आणि "मी" सुरु झालं 
की समजावं, की नात तुटू लागलय 

...नंदू बी. - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments