Rohini Mithe profile
Rohini Mithe
57 3 0
Posts Followers Following
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - ओसंडून वाहण्याइतकं 
आधी भरून यावं लागतं 
भरभरुन दाटलं तरचं
स्वच्छंदीपणे देता येतं..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - आपला  चांगुलपणा 
आपल्यालाचं मारक ठरतो
इतरांच्या मनाला जपतांना
स्वतःच्याच मनाचा खून करतो..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - शंभर बिया पेरता
एक तरी रुजेल 
त्याचं आशेवर मी
रोपासवे उरेल..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe -  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - ओळख लपवली की,
सारं लपवत येतं..
म्हणूनच अनोळखी रहावं
स्वतःला आणि जगालाही..
नाहीतरी सारेच शरीराचं 
 अस्तित्व जोखतात..
आतल्या अस्तित्वाला
कोणता माईचा लाल विचारतो..
जो तो चेहऱ्याची
 ओळख देण्यात गुंतलेला..
आपण सटकावंच मागच्या मागे 
या सटकलेल्या दुनियेतून..
जिथे नसेल कोणी चेहऱ्याचा 
रेषेवरून ओळखणारं..
होवून जावं विरक्त,मुक्त 
वगैरे काहीतरी..
आणि भटकत रहावं कुठेही
अनोळखी प्रदेशात, प्रांतात 
किंवा तिथे, जिथे 
ओळख लपवावी लागणार नाही..
रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - जेव्हा सहजता येते, 
तेव्हा नसती उठाठेव थांबते..
रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - गडद अंधारुन आलं की
मनही तुडुंब भरुन येतं
पावसाच्या थेंबासोबत
तेही रित होत जातं..
रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - सोडलं की सुटतं
 हे का मला कळत नाही 
पण  बांधून ठेवायलाही 
मन आता धजावत नाही..
रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - खरं तरं आयुष्यात 
स्वतःच  असं काय असतं
'इदम् न मम' म्हणत 
क्षणांना भिडण फक्त.. 
रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - शांत होते सावली 
शांत होतो किनारा 
श्वास थांबता सारा 
शांत होतो पसारा..
रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - शेवटचा श्वास 
प्रत्येकाचा ठरलेला 
आयुष्याच्या भटकंतीत 
तरीही जीव रमलेला..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - अजब न्याय वर्तुळाचा
 त्याला आरंभ अंत नाही
 मध्यबिंदूस स्पर्शतांना
 परीघ मात्र सुटत जाई..
 रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - 
दूर एक माळ
उभा एकलाच
त्याची त्याला आच
साहवेना..
ऐश्या सायंकाळी
वाटे हूरहूर
दाटते काहूर
मनामध्ये..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - माझ्या प्रश्नांना 
माझाच उतारा 
तू नेहमीसारखाच
नि: संग नामानिराळा..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - नात्यांची परीक्षा
 घेऊ नये कधीच 
पास होवो नापास होवो 
आपलीच होते क्षती..
रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - ओरबाडणारेचं सारे 
सावरणार कोणीच नसतं 
आयुष्यात शून्य म्हणजे काय 
हे तेव्हाच कळतं..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - 

 शिकवतात सतत 
आयुष्य जगावं कसं 
गर्दीतले होऊनही 
 स्वतःला जपावं कसं
 
ऋण आहेत त्यांचे 
माझ्यावर परोपरी 
सख्यासम जपते मी 
त्यांना मनाच्या अंतरी..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - गुंतण सोप्प असतं
 बाहेर पडणं अवघड 
काळीज फाटत राहतं 
आयुष्यभर निरंतर..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - 

खोल गर्तेत अस्तित्व
 दहा हात बुडवती 
फुस्कारून आले वर 
जगण्याचे नाही भीती 

जात आहे गरुडाची 
चित्कार न करणारी 
अंबराला स्पर्शतांना 
जगण्याची नाही भीती 

जगण्याची नाही भीती..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - म्हणूनच लढायचं असतं..

वाटत तितकं सोप नसत
फुलांना वेचणं
फुलांना वेचता वेचता
काट्यांच बोचणं..
वाटतं तितकं सोपं नसत
नजरेला टाळणं
नजरेला टाळता टाळता
नजरेतून उतरण.. 
वाटतं तितकं सोपं नसत
शब्दाला जागणं
शब्दाला जागता जागता
 आयुष्याच वाहणं..
वाटतं तितकं सोपं नसत
मृत्यूनंतर उरणं
जीवन जगता जगता
क्षणोक्षणी मरणं..
जितकं वाटतं तितकं 
 सोपं काहीच नसतं
 अखेरच्या श्वासापर्यंत 
म्हणूनच लढायचं असतं..
रो..

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - आम्ही कुठेच चमकलो नाही
कारण आम्ही तारा नाही
आम्ही आहोत छोटीशी पणती 
उजळत ठेवतो आतली ज्योती..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - आपले आपण पेरत जावे 
सुंदर चांगले काही बाही..
उगवेल  न उगवेल 
माहीत कुणालाही नाही..
तण उगवेल उगाचच 
त्याला पर्याय नाही..
तू फक्त नांगरणी करत चल
तुझी भूमी तर स्वच्छ राहिल..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - आग कोणतीही असो,
लागलेली किंवा लावलेली
ती कधीतरी शमतेच..
फक्त आपल्याला 
शांत रहाता यायला हवं..

रो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - पणती आली दारी
स्नेह,आनंद घेऊन
अंधार गेला क्षणात 
मागील दाराने पळून..
भरु या ओंजळीत 
ही लख्ख दिवाळी
फिटेल मनातली
रात्र काळी काळी..
चल झडकरी सखे
एक दीप लावू या
दिव्यांच्या अवलीने
आसमंत उजळवू या..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

रो..
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - मूर्खांत रहायचे तर
मूर्खच बनावे लागते
अन् हे कळायला मात्र 
आयुष्य पणाला लागते.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - किनार..
अधुऱ्या कहाणीलाही 
असते एक किनार 
कधी जरतारी तर कधी 
काटेरी टोकदार..

प्रत्येक किनारीचा
निराळाच श्रृंगार 
प्रत्येकाच्या मनाला
किनारीचा आधार.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - मी तुला ओळखते तेव्हा पासून 
 तुला शितल चांदोबा वेड लावतो
हे माहीत आहे मला....
माझी हरकत नाहीच मुळी..
पण, मलाही तो आवडावा असं तुला वाटतं असेल तर..

थांब...................

मला विविध रंगांची उधळण करणारा आणि वेळप्रसंगी आग ओकणारा सूर्य वेड लावतो....

माझं असही एक स्वतंत्र 'अस्तित्व'अस्तित्वात आहे.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - 
वाईटाला तारत
चांगल्याला मारत
उड्या मारत आत
करत हूप हूप..

माणसातन उठवत 
कोपऱ्यात फेकत
म्हणूनच भूताला 
निजवाव चिडीचूप.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - 'खजाना' हा, 
ज्याच्या त्याच्या दृष्टीत असतो..।
काहींना परीसही दगड दिसतो..।
काहींना दगडातही देव दिसतो..।। - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - आभासी या दुनियेत 
कोण कोणाचा असतो 
तुझा माझा परिचय 
तोंडदेखला हसतो.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - काही निथळून जाते 
काही ओघळून जाते 
उरलेल्या थेंबातही
मला आभाळ भेटते.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
8 likes 1 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - अवचित एक सर
हलकेच ओघळू लागली 
अन् अचानक पुन्हा 
आली तशीच निघून गेली..

मोकळ झालेलं आभाळ 
पुन्हा एकदा दाटून आलं
अन् उगीचच आतल्या आत 
पुन्हा तसंच कुढत बसलं..

पुन्हा तसंच कुढत बसलं.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - दाटून आलेलं आभाळ, 
बरसल्याशिवाय रहात नाही.. 
बरसण्या आधीची तगमग, 
दाटून आल्याशिवाय कळत नाही.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - कधी झालं नाही कळलं 
भलतच आक्रीत घडलं
चांगली समज आल्यापासून 
गैरसमज होणं बंद पडलं.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - कधी कधी  आभाळही 
अलगद बरसून जातं.. 
सहन न होणाऱ्या काहीलीला 
सहज विसारायला लावतं.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - माझ्या रागवण्यावरही,
तू प्रेम करावसं..
इतक आपलं नातं,
गहीर होवून उरावं.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - माझे तुला समजत नाही 
तुझे त्याला समजत नाही 
बोलतो आहोत आपण सगळे
पण नेमके काहीच घडत नाही.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - काही ओंजळीने उचलले, 
काही चिमटीत पकडले..
सारेच अनुभव शेवटी,
थोडेतरी शिकवून गेले.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - अंधारल्यावर दिसतोस 
उजाडताच गायब होतोस
इतका कसा तू
माझ्या पापणीत साठतोस.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 1 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - इतकं जवळ येवू नये की
जवळकीच अंतर व्हावं..
नंतर जवळ येण्यासाठी 
आयुष्याने कुढत जगावं.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - आठवणींच्या पसाऱ्यात
मी केव्हाची बसून
दिसतो तूच नजरेला
उगाच आतून आतून.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - जे न मागता मिळतं 
ते न सांगता जातं..
त्यातूनही जे टिकतं 
ते आपलं असतं.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - धन्यवादासाठी थांबायचं नाही 
उपेक्षेणे अडखळायचं नाही 
जीवन मस्त जगून घ्यायचं 
उगाच झुरत बसायचं नाही.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - आपल्या मार्गावर
आपल्याच पावलांनी चालायचं
खडतर असो किंवा मुलायम
ज्याच त्यान सोसायचं.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - उदासीचा क्षणही मी 
अचूक टिपलाय
स्वबळ वाढविण्यासाठी
आत आत जपलाय.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - तुझ्या अनंत आकाशातला,
मी एक  टिंब..
 इवल्याशा टिंबात मात्र,
फक्त तुझेच प्रतिबिंब.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - नाव माझे
त्या फुलांनी विचारु नये.. 
ज्यांनी माझ्या
ओंजळीत काटे दिले.. 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 2 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - चैत्राची पालवी
फुलली पानोपानी
वसंत फुलावा
आपुल्या मनी
चला नव्याने 
सुरुवात करुया
नव वर्षाचे
स्वागत करुया.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - रिकामी जागा भरतेच..
.
.

उत्तराची,वस्तूची, माणसाची 
आणि मनाचीही.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Rohini Mithe
Quote by Rohini Mithe - कान आणि डोळे यांच्यात 
 दोन बोटांचे अंतर..
डोळेही झालेत बेईमान
काय द्याल मग उत्तर..? - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes