Varsha Bagwan profile
Varsha Bagwan
405 135 8
Posts Followers Following
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - पावसाचे संदर्भ 
तुला किती किती देऊ....
मनात पडतोय ,
अल्लड वयात , 
एका गाफिल क्षणी ,
तुझ्यात गुंतलेला ,
समजदार पाऊस....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - विषय तुझा नव्हता 
अन् माझाही....
मस्त मैफिल रंगली होती 
पण प्रत्येकांच्या ओठांवर
चर्चा आपलीच होती....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - तुझ्या सौंदर्याला कुठलीच
उपमा नको
चंद्राशी परत परत भांडणे नको
नको जाईजुई, फुलांचा सुगंध
कस्तुरीलाच कस्तुरीबद्दल 
सांगणे नको....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - जे क्षणांत निसटून जातं
त्याच्या मोहात पडायचं नसतं
अळवावरच्या थेंबांना
आपलं कधीच मानायचं नसतं....

वर्षा - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - विलंब झाला असला तरी  
पानांवरील ओघळणाऱ्या  थेंबांना तू 
पाऊस म्हणू नकोस 
मैलाचे अंतर असले जरी आपल्यात
या दुराव्याला तू 
नात्याचा शेवट समजू नकोस....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - विलंब झाला असला तरी  
पानांवरील ओघळणाऱ्या  थेंबांना तू 
पाऊस म्हणू नकोस 
मैलाचे अंतर असले जरी 
आपल्यातील दुराव्याला तू 
अंत समजू नकोस....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - पावसासमोर कुणाचे
काहीच चालत नाही , अन्
आभाळाच्या मनातले 
कोसळल्याशिवाय कळत नाही.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - तप्त उन्हाची कुठे 
माय पर्वा करते 
सूर्य डोईवर घेते , अन्
लेकरू, पदराने झाकते...

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - छपरावरून  अविरत कोसळणारा पाऊस 
ती खिडकीतून एकटक बघत होती 
जुनं आभाळ भरगच्च भरून आलं होतं
कोसळावं की सांभाळावं 
काही कळत नव्हतं 
अचानक आवाज आला 
अगं ,  " ती खिडकी लाव ,
पाऊस आत येतोय  "
तिने पटकन खिडकी बंद केली 
घराची आणि मनाची पण....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - आपलीच डायरी आपणच चाळताना 
ती नवी भासू लागते 
एकेक पान कमी होताना 
जणू काही  आयुष्य सरू लागते.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - आठवणींच्या हिंदोळ्यावर 
झुलतोय पाऊस 
तुला माहित नाही 
तुजवीन, किती छळतोय पाऊस....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - मृदगंधाने देह व्हावा वेडापिसा 
तुझं येणं म्हणजे अवकाळी पाऊस जसा....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - संपूर्ण आयुष्य, माणूस 
बेरीज वजाबाकी करण्यात घालवतो.....
जाताना मात्र सोबत 
केवळ शून्य घेवून जातो....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - ओलावल्या  पापण्या  नि
तोच मध्यान्ह प्रहर 
चिंब भिजवून गेली पुन्हा 
तीच पावसाची सर.....

वर्षा 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - कधी कधी घाबरलेल्या मनाची ,
होते अशी स्थिती 
सळसळ झाली तरी,
वादळाची भीती....

वर्षा 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - ना चाहूल कुणाची 
ना हुरहूर मनाची 
नुसती जीवाची घालमेल होतेय बघ 
मग अश्यावेळी नक्की , कुणीतरी ,
आठवण काढतेय बघ....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - तोडिले मी सर्व पाश
जरा बरे वाटते 
तुझ्या स्वप्नांची उधारी
आता नको वाटते....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - पान पिकलं म्हणून
गळण्याची वाट बघायची नसते
जन्म - मृत्यूच्या फेऱ्यातून
कोण सुटलं आहे इथे....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - आसुसलेल्या मनाचं मागणं
तेव्हा पूर्ण होतं....
जेव्हा एक चंद्र बघण्यासाठी
किती रात्रींचं जागणं होतं.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - शब्द न् शब्द वाचून झाला
तू दिलेल्या डायरीतला 
एकेक पान मनात
आणखी खोल साठत गेलं....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - खूप काही होतं सांगायचं
पण मनातल्या मनात राहून गेलं
किती घातले बांध तरी
डोळ्यांतून वाहून गेलं....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - बस्सं एवढच  स्वप्न माझं 
पूर्ण व्हायला हवं 
तुझ्या तळहाताच्या रेषांमध्ये
माझं नाव असायला हवं...

 वर्षा 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - तुला भेटायचं म्हटलं तर
मनाची कित्ती कित्ती तयारी असते
तू समोर दिसल्यावर मात्र
ओठ मुके ; फक्त नजरानजर होते.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - जस जसं 
जळात केशर सांडलं
तस तसं
तुझ्या आठवणींचं काहूर
मनी दाटलं....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - जखम सुकली म्हणून मी
खपली काढली
अन्... मग ती पुन्हा नव्याने
भळभळू लागली.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - शक्य नसते
आकाशातील तारे मोजणं.....
किती कठीण असते ना
माणसांतील माणूस शोधणं....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - तुझ्या माझ्यात नेहमी
अस्संच होतं.....
तुझ्या शब्दांचं
माझ्या मनावर ओझं होतं.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - लोकं म्हणतात वेडात
माणूस काहीही करतो
पण तुझं तसं वेड
मला कधी लागलंच नाही....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - काजव्याच्या प्रकाशाने
आसमंत उजळत नसतो.....
सूर्य ढगाआड गेला तरी
त्याचं अस्तित्व जाणवत असतं.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - नातं तुटलं की सगळं
संपलं असं  वाटतं....
विसरायचं म्हटलं तर
सारं काही आठवावं लागतं....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 1 comments

Explore more quotes

Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - तुझ्या गावाच्या वेशीवर आजही ,
माझी पाऊले अडखळतात
हे एकच गाव जपलं होतं मी ,
मनाच्या खोल तळघरात....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - दोघांमध्ये असं ठरलं होतं
की ,
आपण कधीच भेटायचं नाही
जर ,
चुकून भेटलो अनोळखी वाटेवर
तर  ,
ओळख दाखविल्या शिवाय परत जायचं नाही

वर्षा 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - लोकं म्हणतात
आग विझवतो पाऊस
पण विरहात कित्येक मनांना 
जाळतो पाऊस....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - विठ्ठल उभा राहिला मनी
अवघ्या देहाची पंढरी झाली....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - तुझा मायेचा पदर हरवलाय आज
जणू सावलीचं एक झाड कापल्या गेलं....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - वाऱ्याची झुळूक आली की
मन शहारून जायचं
पूर्वी तळ्याच्या काठावर बसले की
कसं शांत शांत वाटायचं ....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - मुख्य रस्ता ओलांडला की
लगेच , डाव्या बाजूला तिचं घर लागतं
त्या प्राजक्ताच्या परिमळाने
अजूनही मन व्याकुळ होतं....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - आवरायचं आवरायचं तरी 
किती मनाला
सावरायचं सावरायचं
किती नाजूक क्षणांना
एक मन म्हणतंय  , 
आयुष्य थोडं आहे,
मनासारखं जगून घे ,
दुसरं मन म्हणतंय ,
मनावर ओझं होईल, 
असं कधी वागू नये ....
वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - हल्ली तसं विशेष काही
सुचत नाही
पण तुला पाहिल्यावर मग ,
मी लेखनीला आवरत नाही.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - खूप काही असतं , सांगण्यासारखं
आयुष्याच्या कुपीत ,  जपून ठेवण्यासारखं 
मोजून ठेवतो  म्हटलं तर , श्वास नाही पुरत
बेरीज वजा करता , काहीच नाही उरत....

वर्षा 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - दाटून यावे पावसाने
पुन्हा एकदा तरी
मग , अविरत कोसळाव्या
विरहाच्या सरी.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - पौर्णिमेचा चंद्र
तुझ्या केसांत माळला मी
बघ श्वासांची कोजागिरी झाली....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - तळवा जितका खोल 
तितकंच उरतं
ओंजळ भरली तरी
हातून निसटून जातं....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - माय परीस - परीस
जीवनाचं सोनं करते
बाप फणस - फणस
आत माया लपवितो

बाप छप्पर विणतो
माय घरपण देते
काय वर्णू मी शब्दांत 
लेखणीला भोवळ येते ....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - बघ तरी
तुझ्या - माझ्यात
अंतर किती.....?
जशी चंद्राजवळ
चांदणी उभी....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - खूप काही माझ्या अपेक्षा
नाही तुझ्या कडून.....
फक्त , तुझ्या डोळ्यांत
माझं एक इवलंसं घर
आणि
तुझ्या श्वासांचा दरवळ
असावा घरभर....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - मनात प्रश्नांचं काहूर होतं ,
जगण्याचं वेड होतं ,
आयुष्यावर लिहून सुध्दा ,
आयुष्य अजून कळलं नव्हतं.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - कळले नाही अजूनही
तुझ्या मौनाचे अर्थ
एक कळी उमलण्यासाठी , मी 
किती ॠतूंना पालथे घातले....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - आपली प्रत्येक भेट शेवटची ठरावी
म्हणून मी भेटत होते ,
पण त्या प्रत्येक भेटीत..... तुझ्यात ,
पुन्हा.... नव्याने गुंतत होते....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Varsha Bagwan
Quote by Varsha Bagwan - दिल्या- घेतल्याचा हिशोब नको...!
भेटींचे मोजमाप नको...!
आठवणी तर मोजूच नको...!
मी तर  ,
अख्खं आकाश नावी करून घेतलंय ,
फक्त.... एका चंद्रासाठी.....

वर्षा  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes