Shambhu Priti profile
Shambhu Priti
48 3 2
Posts Followers Following
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  वाटे मज त्या खगासम व्हावे..
 उंच नभी स्वैर उडावे .
कधी नदीच्या जलामधी . 
कधी आकाशी कापसामध्ये   
वाटे मज त्या खगासम व्हावे ..
गर्द वनराईत झुलावे. 
रातराणी सवे बहरावे.
 मधुर आम्रकुसमा प्राशावे ..
वाटे मज त्या खगासम व्हावे...
 प्राशावे चकोर होऊनी चंद्रकिरणा, 
कधी चातक होऊनी जलधारांना. 
वाटे मज त्या खगासम व्हावे..
 मयूर होवोनी सप्तरंग उधळावे. 
कधी कोकिळेसम गावे .
वाटे मज त्या खगासम व्हावे,
 उंच उंच विहरावे ,
क्षणात एका 
विश्वसफर करूनिया यावे..

shambhupriti  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - . - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  शुभ्रवसनी, कमलनयनी,
माय माझी सरस्वती ..
प्रिय मला माझी लेखणी,
शब्द गुंफण्या जी तरसती..
वीणावादिनी, हंसवाहिनी,
माय माझी सरस्वती..
विचारांचे पुष्प उमलती.
आशीर्वाद मजवरती,
मुक्तहस्ते ती उधळती.. 
माय माझी सरस्वती, 
तिच्या दर्शने कर जुळती...
शब्दघट हे अमृताचे,
रोज जणू मी प्राशिते...
माय माझी सरस्वती..
जन्मभरी करेन तपस्या तुझी, 
आशिर्वादाचे हस्त तुझे,
 सदा राहो माझ्या माथी.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -   येते जेव्हा आनंदाची भरती ,
मनाचा दर्या काठोकाठ भरतो.
ते काय कमी म्हणून,
नयनी ही पुर येतो.
खूप काही बोलायचं असत.
पण शब्द तर भिजलेले 
आनंदाच्या रंगांनी..
सांगा कस अन् 
काय बोलावं थरथरत्या अधरानी.
अशा वेळी गप्पच बसते,
थोडंसं हसून घेते.
अन् मग पुन्हा 
शब्द अन् लेखणी सरसावून,
हलकेच कागदावर उतरते.
यापेक्षा काही वेगळं नसत.
तेच बोलायचं असत..
तुम्ही जे बोलून दाखवता.
ते आम्ही लिहून...... - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -   मन अगदी विषण्ण होत.
काय बोलावं सुचत नाही.
भावना अनावर असतात.
अशावेळी त्या अनावर भावना,
 ते अश्रू नी ओले झालेले शब्द.
जणू घुसमटलेल्या
 त्या गरम श्वासाने वाफ होतात..
          अन् 
हलकेच तरंगत कागदावर उतरते.
यापेक्षा वेगळ काही नसत.
तेच बोलायचं असत.
तुम्ही जे बोलून दाखवता.
ते आम्ही लिहून...... - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  विचार रुंजी घालतात डोक्यात.
कविता स्फुरते मनात .
मन:पटलावर चीतारते अस्पष्ट.
अन् मग अक्षरपंख लेऊन ,
संगे भावना घेऊन..
अलगद उतरते कागदावर.
या पेक्षा वेगळं काही नसत.. 
तेच बोलायचं असत..
तुम्ही जे बोलून दाखवता.
आम्ही ते लिहून.....  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  येते जेव्हा आनंदाची भरती ,
मनाचा दर्या काठोकाठ भरतो.
ते काय कमी म्हणून,
नयनी ही पुर येतो.
खूप काही बोलायचं असत.
पण शब्द तर भिजलेले 
आनंदाच्या रंगांनी..
सांगा कस अन् 
काय बोलावं थरथरत्या अधरानी.
अशा वेळी गप्पच बसते,
थोडंसं हसून घेते.
अन् मग पुन्हा शब्द अन् लेखणी सरसावू,न
हलकेच कागदावर उतरते.
यापेक्षा काही वेगळं नसत.
तेच बोलायचं असत..
तुम्ही जे बोलून दाखवता.
ते आम्ही लिहून......

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  "ती" ची शक्ती म्हणजे "वाणी" 
 वापरण्याचं तंत्र तिज ठाऊक.
कुठे बोलायचं अन् कुठं नाही.
कुठं व्हायचं कठोर अन् कुठं भावूक. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  "ती" ची शक्ती 
म्हणजे "समर्पण"
सार काही करुनी अर्पण.
 पुरुष अन् प्रकृतीच 
घडवते मिलन.
राखण्या सृष्टीच संतुलन - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  "ती"ची शक्ती म्हणजे , 'लेखणी,'
मनातील भावना अनावर, 
अलगद उमटवते कागदावर,
म्हणूनच
गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा चा अजूनही
प्रभाव लोकांवर. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  "ती"ची शक्ती म्हणजे '' त्याग"
उर्मिलेचा ही त्यागच होता..
अन् जगाला फक्त
 सीतेचा वनवास दिसला.
येसुबाईंचा ही त्यागच होता.
अन् जगाला फक्त
ताराराणीचा पराक्रम दिसला. - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  *ती" ची शक्ती म्हणजे "भक्ती"
जी सती अन् पार्वतीने केली..
लाभण्या शिवशंभो पती. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - अगदी खोल गेलात,
 कधी मनाच्या तळ्यात..
बघा एकदा जाऊन, 
जाताना भेटतील आठवणींचे प्रवाह
एकाला एक जोडलेले..
काही लहान काही मोठे,
तरी ही सांधलेले.
काही कटू तर काही 
माधूर्याने भरलेले.
मधेच सारे लुप्त झाले 
जशी नदी सरस्वती ..
कुठे विसावले सारे,
प्रश्न विचारून पाहे.
 माझ्या भावनांचा डोह
खाली तळाशी आहे..
वरूनच अंदाज घेऊया 
भावनांच्या डोहाचा.
नको उतराया आत
 मार्ग ना ठावे परतीचा..

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  देती मला बळ,
तुझ्या असण्याचे धागे..
              नवी आव्हाने पेलाया,
              दुःखात हसाया ..
देती मला साथ,
तुझ्या असण्याचे धागे..
             पुरी करण्या कर्तव्या
             काव्य गुंफण्या मनीच्या.
देती मला सुख,
तुझ्या असण्याचे धागे.
              पदरी टाकल्या मातृत्वा..
              रंग भरण्या आयुष्या,
               दिलेल्या सौभाग्या..
देती मला सर्वस्व,
तुझ्या असण्याचे धागे.....


shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - तुझ्या माझ्या गोष्टीतही
राजा आणिक राणी
पण तरीही जराशी
वेगळीच आपुली कहाणी
तु बोलका 
तर मी मितभाषी.
तू वास्तवात तर 
मी  रमणारी स्वप्नात..
तुझ्या माझ्या गोष्टीतही
राजा आणिक राणी
पण तरीही जराशी
वेगळीच आपुली कहाणी
ना कधी कुठल बंधन.
ना कधी मनमानी
रंग रूप न बघता मज केले जीवनसंगीनी ..
सातच काय हजारो 
जन्म मागते तुजला मनोमनी..
तुझ्या माझ्या गोष्टीतही
राजा आणिक राणी
पण तरीही जराशी
वेगळीच आपुली कहाणी

Shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - एक आभाळ मोकळे
म्हणून,
नटले सजले...
भर दिवसा ही तेव्हा,
सखे अंधारून आले..
ढग दाटूनी आले.
मनी काहूर माजले.
एकाएकी सखी,
नेत्र का ओलावले? 
मनी सतावे चिंता 
काय असेल ग झाले?
वार्तानी युध्दाच्या मन
कासावीस झाले.
एवढ्यात वार्ता आली...
युद्ध जिंकले सख्याने...
हर्षाने भरले मन,
पंख पाखराचे झाले.
सखी बघ मी, 
जाऊन सख्याला भेटले.
एक  आभाळ मोकळे ,
पुन: मला गवसले...
एक आभाळ मोकळे.
पुन: मला गवसले...

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - आजकाल भक्ती ही 
अपेक्षा ठेऊन करतात..
एका नारळाच्या बदल्यात 
खूप काही मागून घेतात 
मग प्रेमाचं तर राहूच द्या..
प्रेमात तर होतय
 अपेक्षांचं जिवापार ओझ..
         अन् 
आयुष्य निघून जात, 
करत तुझं माझं..
निरपेक्ष प्रेम कुणी 
करत नाही, 
स्वार्थाशिवाय कुणी 
जवळ येत नाही.

shambhupriti  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - 

"काय सांगणार"

shambhupriti  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - प्रेम की यातना,
सांग सखी काय हवे तुला...
प्रेम जरी तू मागितले,
यातना ही अलवार येणार..
प्रेमरुपी गुलाब सदा,
 काट्यावरती फुलणार...

shambupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - बोलायचं  तर असत...
मनात वाक्य तयार असत..
पण ओठावर यायला घाबरत..
ते लेखणी मात्र लिहून टाकते..

प्रत्यक्षात असणारे "अहो"
जिथं सखा बनतो..
भावनांच्या जलधारानी चिंब भिजतो..
हे करण्याचं सामर्थ्य ,
फक्त माझी लेखणी दाखवते.

त्याच हसण,माझं रुसण ..
कधी त्याची मनधरणी..
 प्रेमाच्या मोरपिशी आठवणी,
आठवणीची साठवणी..
सगळं काही माझी लेखणी करते....


म्हणून मी कविता करते

शंभुप्रीती  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - सोबतीने चालू जन्मभर, 
घेतल्या किती आणाभाका..
मग आता का वागतो तू परक्यासारखा..

सूर्य जाता क्षितिज ओलांडूनी, 
केशरी शाल घेतय आभाळ गुंडाळूनी..
अशा या सांजवेळी सख्या तुझी आठवण येते मनोमनी...

माहितेय तूझी ही अवस्था याहुनी नाही वेगळी..
मग  का हा दुरावा का हा अबोला
जे आहे मनी ते बोलूनी टाक
रागवायच तर खुशाल रागव ..
तुझ्या माझ्यातील गैरसमजाच वादळ .
एका वाफाळत्या चहाच्या कपात अलगद बुडवून टाक.

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti -  पोटी मुलगी यावी, 
घरभर पखरण कराया आनंदाची..
लाडकी म्हणून मिरवाया बाबांची
प्रतिमाच जणू आईची.
पोटी मुलगी यावी ..
बागडावी माझ्या अंगणी,
बनून नक्षत्राची चांदणी..
पोटी मुलगी यावी,
होऊन सूर्यासम तेजस्वी..
सोबत हवी शीतलता चंद्राची ..
पोटी मुलगी यावी.. 
नम्रतेच लेण अन्.. 
कर्तव्यपूर्तीचा साज लेवूनी..
पोटी मुलगी यावी.. 
शालीनतेच वागणं नी बोलणं..
अन् मर्यादेच जीण शिकुनी..
 पोटी मुलगी यावी 
जिजाऊंची लेक होऊनी.
सावित्रीचा वारसा घेऊनी, 
झाशीच्या राणीसम मर्दानी होऊनी ..
पोटी मुलगी यावी .
लक्ष्मीच्या पावलांनी.. अन्...
सरस्वतीच्या आशीर्वादानी..

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - ज्ञानगंगा पोहचवण्या खेडोपाडी,
झालात भगीरथ तुम्ही..
बहुजन शिक्षणासाठी दऱ्या खोऱ्या 
डोंगरवाटा तुडवल्या तुम्ही..
भेदाभेद अस्पृश्यता या साऱ्यांना
मूठमाती दिलीत तुम्ही..
ज्ञानोपासनेसोबत श्रमाचे महत्व
नी स्वावलंबन शिकवलेत तुम्ही..
ज्ञानदीप लावून हरेक झोपडीत..
अज्ञान अंधकार पळवलात तुम्ही .
शिक्षणाच्या महान यज्ञात..
तन मन धन अर्पिले तुम्ही..
रयत माऊली वहिनींच्या त्यागास
सार्थ घडवले तुम्ही..
माझ्यासारखे असंख्य पक्षी,
तुमच्या वटवृक्षी वाढले..
ज्ञानरूपी अमृत तोशोनी,
यशस्वी जीवनी जाहले....


शंभुप्रिती  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - पूर्वापार चालत आली गुरु शिष्य परंपरा.
 ज्ञान घेण्या विद्या शिकण्या शिष्य जाई गुरुच्या घरा.
 एकलव्य विद्या घेण्या गेला द्रोणाचार्याकडे. 
शिष्य मजला करून घ्या 
घातले त्याने साकडे. 
द्रोणाचार्यांनी एकलव्यला दिला नकार
गुरुच्या या नकाराचाही एकलव्याने केला स्वीकार.
मूर्ती बनवली मातीची तिलाच केले गुरु,
मूर्ती पुढे बसून त्याने विद्यार्थ्यास केला सुरू..
 सर्व विद्येत एकलव्य झाला पारंगत,
 पण गुरुचे वागणे मात्र झाले विसंगत.
 गुरूंनीच केला दोन शिष्यात भेद.
 गुरु शिष्य परंपरेतील तत्त्वाला दिला छेद.
 विद्यादान न करता ही मागितली गुरुदक्षिणा. 
एकलव्याने ही दिली अंगठा कापून आपली गुरुदक्षिणा.
 धन्य तो एकलव्य धन्य त्याची गुरुभक्ती..
 जिथे घडला एकलव्य धन्य ती भारतीय संस्कृती .
*एकलव्य*
 *ए* काग्र चित्ताने अभ्यास करणारा 
*क*  कर्तव्यासह ज्ञानप्राप्ती करणारा 
*ल* क्षवेधी कार्य करणारा 
*व्य* र्थ न जाई त्याचे श्रम

shambhupriti  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - . - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - .

shambhupriti 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - आठवण तुझी 
जशी सागराला येई भरती.
जीव माझा सखया जडलाय तुझ्यावरती. 
आठवण येई प्रत्येक क्षणाला,
अन् प्रश्न पडतोय माझिया मनाला.
तूच माझा सखा तूच सजना.
राहू कशी मी तुझ्याविना??
तुझा दुरावा मला सोसवेना,
आता तुझ्याशिवाय राहवेना.
तू माझा राजा अन् मी तुझी राणी,
वाटे तू आहेस माझ्या नयनी.
खरचं
 आठवण आली तरी रडत नाही मी,
वाटते जणू तू ओघळशील आसवातूनी. 
नयनी तू लपून राहावे,
 म्हणून मिटून घेते घट्ट नेत्र...
कारण 
नयनी तुझ्या आठवणी
मनी तुझाच ध्यास
अन् प्रीतीला ही लागे
शंभूचीच आस...

shambhupriti  - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - कधी हसणं कधी रुसण.
रागावून ही समजावणं..
आठवे मज तुमचं वागणं.
गमतीच ते बोलणं..
वाटते सख्या तू असावं
 अवतीभोवती..
भास ही होतो जसा,
तू आहेस सभोवती.
का हा विरह? का हा दुरावा?
सहवास वाटे हवाहवासा.
हितगुज माझे तुझिया कानी.
तुझ्या ओठावर सुरेल गाणी.
कळी आपल्या संसाराची 
हळूहळू फुलेल..
रंग आपल्या प्रेमाचाही 
हळूहळू खुलेल..

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - जेव्हा ठरवलं,
तुम्हाला विसरायचं.
या साऱ्या आठवणीतून सावरायचं.
जेव्हा जेव्हा विसरायला गेले,
तुमच्याच आठवणीत हरवून बसले .
आठवणे,विसरणे ही अवस्था मनाची
मनात होई गर्दी सारी आठवणीची
जेव्हा ठरवलं रिता करायचा,
मनाचा तो कोपरा 
मन माझं थरथरल अन् श्वास झाला कापरा 
जेव्हा ठरवलं मनानं 
तुला विसरण्यातच असेल दोघांचंही भल 
तर पुन्हा पुन्हा का आठवाव
आठवणीच्या या जगात का बर 
पुन्हा पुन्हा हरवाव???
जेव्हा ठरवलं..

shambhupriti  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - 

s.s.s.वसुंधरा व्हावी अशी .
जणू काही फुले तिची .
जणू काही झाडे तिची .
जणू काही नदी तिची.
 जणू काही धरती तिची. - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 1 comments

Explore more quotes

Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - तुझ्या मिठीत स्वर्ग माझा
मी तुझी अन् तू माझा..
स्पर्श तुझा जसे..
मोरपीस हळुवार..
मन होई ओलेचिंब जसे
दव अलवार 
मिठीत घेता तू पडे 
जगाचा विसर
वारंवार

shambhupriti  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - होवोनिया लहर वाऱ्याची,
छेडावे तुज..
कधी होवोनी भ्रमर
कानी सांगावे गूज...

shambhupriti  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - पाण्याचा थेंब होवूनी, 
अधरा तुझ्या स्पर्शूनी..
व्हावे तृप्त तू,
              अन् तृप्त मी...

शंभूप्रीती - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 3 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - हलक्या सोनेरी उन्हात..
दबक्या पावलांनी येते ती..
चिंब चिंब करून टाकते ती..
मनसोक्त बरसते,बेधुंद गाते ती..
हिरवागार गालिचा जणू,
त्यावर हिऱ्यासारखी चमचमते ती..
पण...
दुसऱ्याच क्षणी येतो तो 
अन् जणू घेऊन जातो स्वतसोबत..
क्षणात येते क्षणात जाते..
जणू काही सांगते
आयुष्य ही असेच आहे..
मिळाले ते जगून घ्यावे..
 आनंदाने..
प्रश्न आहे प्रत्येकास ...
कोण असेल बरं "ती"
ती म्हणजे श्रावण सर...
अन् *तो *"सूर्यकिरण"
हलक्या सोनेरी उन्हात
श्रावण उमटतो मनात...
श्रावण दाटतो मनात..
.

shambhupriti  - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - . - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - . - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - विशाल उदर नी 
नाजुकसे नेत्र..
तुझी छाया नी माया 
मज लाभते सर्वत्र..
तुझ्या दर्शनाने होतो,
शुभ कामाचा प्रारंभ..
दुःखाचा शेवट अन्
सुखाचा आरंभ..

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - . - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - होवोनिया लहर वाऱ्याची,
छेडावे तुज...
कधी होवोनी भ्रमर,
कानी सांगावे गुज..

shambhupriti
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - तुझ्यावर काव्य बांधण्या,
सरसावली लेखणी....
थरथरला तो कागद, 
बघून ओलावलेली पापणी .....

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - .

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - .

shambhupriti - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - व्हावे मी शुभ्र कागद,
अन् तू लेखणी....
माझ्या मनी सख्या रे,
तुझ्याच  आठवणी...

शंभूप्रीती - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - ..
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - ..
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - ..
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - या भावना मनीच्या,
उमटतात कागदावरी.....
ज्या शब्दरूप न घेता फिरतात,
ओठावरूनी माघारी.....

शंभुप्रिती - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
Shambhu Priti
Quote by Shambhu Priti - रडताना ओघळलेले 
अश्रू येतात नजरेला..
हसताना लपवलेले
अश्रू जाळतात काळजाला.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
6 likes 0 comments