madhavi nd profile
madhavi nd
89 14 18
Posts Followers Following
madhavi nd
Quote by madhavi nd - 

कोण देतसे मजला टाळी, कोण देतसे हाळी
काळोखाच्या वेलीवरती, कोळी विणतो जाळी

दोन घडीच्या डावामध्ये,  नकोस मिरवू तोरा 
श्वासाच्या या भात्यावरती नियती करे पहारा
रिक्तच होती रिक्तच आहे, हातामधली झोळी
काळोखाच्या वेलीवरती, कोळी विणतो जाळी

माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 

आयुष्याच्या ऐलतीरावरून पैलतीरावर जाताना

पुन्हा पुन्हा मागे वळून पाहताना

मन क्षणभर रेंगाळते... 

उत्कटपणे जगलेल्या क्षणांची

अनंत आवर्तने 

पायवाटेवर ठसा उमटवत राहतात....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - भावविश्व

लख्ख अंधारात
दिशा हरवतात
तेव्हा या उध्वस्त वेळी
ऐकू येतात
निष्पाप कळ्यांचे श्वास
अन् काठावर उभी 
राहून मी 
गुणगुणते प्रार्थना 

उमलणाऱ्या कळ्यांचे 
अबाधित राहो
 भावविश्व ....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - काळोख

गर्द काळोख्या रानात
भय लपले मनात
पाऊल थरथरते
मन ही घाबरते
एकटीच मी या वनात
गर्द सावल्या अंधाराच्या
कोसळती अंगावर
दूरवर चाहूल श्वापद ते भयाण
कुठनही नाही थारा
एकटी मी नार
शांत काळ्या डोहात
अंधाराचे प्रतिबिंब
एकटा तो चंद्र नभात
काटेरी मार्ग दाखवत
दुर कुठेतरी चिता जळते
तीच एक चाहूल
काळोख उजेडाच्या
सीमारेषेवर ची
ती ओळखीची
शेवटची खूण .....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - आजकाल कविता आतून 
उमलत नाही
लिहायला बसल्यावर
शब्दांमध्ये काही
समावत नाही....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - त्या दूर डोंगरावर खुलू लागली पश्चिमा
रंगात बुडाल्या दिशा अन् ढगास लालिमा
आकाशी दिसू लागल्या बगळ्यांच्या माळा
अशा मुग्ध सांजवेळी दिसे कुणाची प्रतिमा

अंधार होता होता मूक झाले भास आभास
व्याकुळ आठवणीचे दाटले गर्द आभाळ
खुणा पावलांच्या मिटून गेल्या तरीही 
उमलून आली मनी स्वप्न काही वेल्हाळ

दूर तमावर उमलून आले चांदणे
काळजात द्वंद्व अन् स्वैर झाली स्पंदने
खोट्या शपथा अन् खोट्याच वचनाची
काळीज रचते,  स्मरते कातर कातर गाणे

आजही बहरतो चाफा अन् खुलतो चंद्रमा
बागेमध्ये धुंद करतो मोगऱ्याचा तोच गंध 
ही सांजवेळ पिताना व्याकुळ होतो कंठ 
मूक स्वप्न करून कैद पापण्या होती बंद

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - सहजच एका  कातरवेळी
आठवण थोडी शहाणी वेडी
पाय सोडून 
बसली पाण्यात...

तेव्हा
नदीला जाणवला 
आठवणीचा 
शाश्वत प्रवास

नदी थोडी
शहारली, मोहरली
सारे काही 
समजून उमजून
वाहत राहिली
बोट आठवणींचे 
पकडून....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 

मला द्यायचे नाहीत 
तुला फक्त शब्द
मला द्यायचे आहेत तुला 
 शब्दा पलीकडचा एक नाद, एक ध्वनी
जो युगेनयुगे 
निनादत राहील
तुझ्या मनाच्या 
विशाल अंतरिक्षात.....!

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - हिरकणीचा अंश

आता कापलेत 
मी सर्वच बंध
मागे वळणारे…

समोर उभ्या
असलेल्या 
काळकभिन्न कातळाचे
टोक फक्त 
खुणावत आहे…

ते टोक गाठताना
उसवतील माझे
श्वास ही
सोलवटीतल माझे 
प्राण ही …

 पण कोण जाणे 
पोहचेलही 
मी तिथवरही
हिरकणीचा अंश 
आहेच माझ्या 
रक्तातही !

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 1 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - शुष्क झाडावर
काही शुष्क पाने
एक पक्षांचा थवा
येत असतो
ऊन उतरल्यावर
आसऱ्यास
तप्त वाऱ्याच्या झळा
अंगावर घेत
गातात संध्यासमयीची
काही आर्त सूरातील गाणे
कदाचित असतील
अगम्य भाषेत
पावसास आळवत
का घालत असतील
साकडे ?....
वाळलेल्या खोडासाठी

©माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

madhavi nd
Quote by madhavi nd - सांज आली खिडकीशी
उगाच कातर तुळशी
तिची एक छाया
कुठेतरी हरवली

हलकेच दाटून येईल
आता घनदाट तिमिर
काहूर काहूर मन
जशी खोल खोल विहीर

वेड्या चाफ्याचे फुल
उंबरठ्यावर थरथरले
कलत्या सूर्याची किरणे
जणू अंगणी गोंदलेले

आता नक्षत्रांचे गाणे
नदीच्या ग ओठी
तिच्या शांत तीरावर
पडेल चांदण्यांची दिठी

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - कवी शंभर

अबब !! एका मंचावर कवी होते शंभर
जो तो म्हणे कधी येईल आपला  नंबर

सूत्रसंचालकाने घेतला माईक हातात
म्हणाला चला काढू कवितेची वरात

एकेक कवी गाऊ लागला तालासुरात
मंचावर बसलेले दात खाऊ लागले मनात

संचालक म्हणतो, अहो ! आवरा, आवरा
समोरचे प्रेक्षक कुठे गेले बघा तरी जरा

शेवटी फक्त संचालक अन् एक कवी वैतागलेला
प्रेक्षक वर्गात एक कुणी तरी होता पेंगलेला 

संचालक म्हणे का हो तुम्ही गेले नाही घरला
तो रडत म्हणे, जाऊ कसा मी तर माईकवाला

😀😀

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 1 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - गोठून आला आहे शांततेचा काळ, की
मनात थैमान घालते वादळ आहे

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - नमी...

बात इतनी सी थी की
सांसे बढती गई
उम्र गुजरती रही
दोनो के बीच
एक खामोशी की
नदी बेहती रही
अब तो आलम
ये हो गया
की तुम तुम रह गये
और मै तुम्हारे बिना
इक  तसविर
बन गई...
वैसे तो कहानी
यंहा रुकी तो नही
लेकीन जजबातो मै
अब पेहले की नमी
तो भी नही रही..

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
11 likes 2 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - संक्रमण

या नव्या संक्रमणात
मी जपून ठेवत आहे
गतकाळाची आरास
धुमसणाऱ्या ज्वलामुखीत
होण्याअगोदर 
साऱ्यांची राख....

फट्ट म्हणता ब्रम्हहत्या 
होणाऱ्या या दिवसात
जपून ठेवायला हवे
संस्कृतीचे धागेदोरे
जे सांगतील येणाऱ्या पिढीला
इथे नांदत होती माणुसकी 
अन् वाहत होते पृथ्वीवर 
नंदनवनाचे वारे....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
2 likes 0 comments

आता मनाच्या डोहात
खोल खोल जाताना
ऐकू येतो फक्त
कवितेचा गलबला....
ह्या मुक्या दिवसांच्या 
मौन चाहुलीत दिसत राहतो
एक तीक्ष्ण चिरंतन 
शब्दांचा भाला
आणि आयुष्याच्या भाळावर
घेऊन पुढे जातो काफीला 
कवितेचा वारसा.....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - ही केवढी शांतता 

सभोवताली

हा काळ गोठला आहे की

दरवाजा घट्ट लावला

आहे मी 

माझ्या मनाचा.....

©® माधवी देवळाणकर  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - निळे फुलपाखरू - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - नसतोस तू समोर तरीही बोलत राहते
अर्ध्या रात्री चांदण्याशी कुशल तुझे पुसते....

©© माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

madhavi nd
Quote by madhavi nd - YOUR BRAND 
YOUR IDENTITY - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - मन

मन आल्याड पल्याड

मन माडाचे ग झाड

घातले ग जणू त्याने

 साऱ्या जगाला कोड

मन डोळा काजळ

जसे असते आभाळ

गाभूळल्या क्षणात

बाई पडे चंद्राला खळ

मन नाजूक हळवे

जसा काचेचा पारा

गंध घेऊन फिरतो

रानोवनी खुळा वारा

मन सतार सतार

विणेवरचा मंद स्वर

होतो त्याचा ग मोर

त्याला जरतारी चंद्र कोर

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 

हे पुण्यवान भू तू माझी जननी

इथे वाहे गोदा पवित्र जीचे पाणी!!धृ!!

सांगू किती महती माझिया मातेची

मनामनात वसते बोली जिथे प्रीतीची

दगडातून उलटे शिल्प कोरिलें जिथे

ते वेरूळ अजिंठा अन् धन्य ती लेणी !!१!!

प्रतिष्ठान या नगरी वसे आमुचा नाथा

ज्याने पाजिले गदर्भा हो प्रेमाने पाणी

माहुरगडी राहते आमची माय रेणुका

जीचा डंका वाजतो गर्जत त्रिभुवणी !!२!!

काळासम निधडी छाती असा देवगिरी

पाहून त्याला शत्रू कापे भयाने उरी

मराठवाडी मातीची रांगडी हो बोली

फ़ुलाफ़ुलात प्रसवते गोड मधुर वाणी !!३!!

संत महंतांची पवित्र भूमी ही आमुची 

उंचावे मान गौरवाने हा इतिहास पाहुनी

चला गाऊ गीत आता मराठवाड्याचे

विजय पताका बघा डौले निळ्या गगनी !!४!!

माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 

कोणास कसे कळावे 
सुखी सार जीवनाचे
फाटक्या सदऱ्यास
ठिगळ अनंत इच्छेचे

जाणून घ्यावे एक 
जन्म, मृत्यू  सत्य अंती
नव्याने पैल गाठाया
रुजवू दया, क्षमा, शांती

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - कधीतरी येते अवचित 

 एखादी अर्धवट कविता समोर

तेव्हा… 

लिहलेल्या ओळी वाचूनही

उमजत नाही तिचा प्रवास…

असे वाटते की 

थबकली आहे 

कुणाची तरी वाट पाहत

नागमोडी वळणावर….

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
4 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 
या ग या सयानो आभाळाला भेटाया जाऊ या
नागपंचमीच्या सणाला चला झोका हा खेळाया 
गारगार लिंबाच्या सावलीत बांधला ग फांदीला 
पाहून तयाला मन भेटाया गेले उंच नभाला

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - छायाचित्रे

 तेंव्हाचा तू अन्
तेंव्हाची मी 
सोनेरी वर्ख लावलेल्या
अनुभवाचे थर रचून
विस्मृतीत गेलेल्या
आपल्या कोवळ्या भावना
आणतील का परतुन
हे छायाचित्र ......?

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 1 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - असा पाऊस द्वाड मेला
अंगणात घाले धिंगाणा
झोडपतो ह्याला त्याला
पळभर ही थांबेना

जाऊ कशी परसात
वीजबाई दळण दळते
ऐकून तो गडगडाट
काळीज माझे थरथरते

वाऱ्याच्या ही आले अंगा
सुं सुं करून घोंगावतो
पिंपळाच्या पानाशी बाई
उगाच वेडा सलगी पुसतो

झाले झिम्माड झिम्माड
डोंगरावर खोपा डुलतो
मनामध्ये काही उचंबळे
तो कानी गाणे म्हणतो….

©®माधवी देवळाणकर

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 1 comments

6 likes 1 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 

मग खेळत राहते 
झिम्मा
कोणी तरी तार स्वरात 
गाणे म्हणत असते
"नाच ग घुमा"......

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

madhavi nd
Quote by madhavi nd - 

असा पाऊस पाऊस
जसे जंतर मंतर
वाटे नित कोसळतो
मनामध्ये 
एक पाऊस निरंतर.....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - लाव्हारस

दिवस संपल्यावर
दार,खिडकी 
गच्च बंद करून
कान गच्च झाकून 
मी डोकावतो 
माझ्या आत मध्ये
तर तिथेही 
लाव्हारस 
उकळतच असतो…..

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 

क्या पता कुछ पाया है
या कुछ मैने खोया है
जिंदगी के सफर पर
ख्वाबो का साया है…..

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 

नसते कारण काहीही
तरीही मन अस्वस्थ होत जाते
ओल्या झालेल्या काळजास
सर एक बिलगून राहते

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - पाण्याच्या डोहावरती एक वेदना तरंगली
कमळ देठातून जशी एक कविता उमलली

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 

शुष्क झाडावर

काही शुष्क पाने

एक पक्षांचा थवा

येत असतो

ऊन उतरल्यावर

आसऱ्यास

तप्त वाऱ्याच्या झळा

अंगावर घेत

गातो संध्यासमयीची

काही आर्त सूरातील गाणी

कदाचित असतील

अगम्य भाषेत ....

पावसास आळवत...

का घालत असतील

साकडे ?....

वाळलेल्या खोडासाठी

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - मनात रुजलेली 

तुझ्या अस्तित्वाची

चिमूटभर माया

अन् त्यात उजळून

निघालेली माझी छाया.....

किती अन् काय काय

सांगायचे असते तुला

पण नाही 

प्रिय… 

त्या दोन शब्दांमधली 

रिकामी जागा 

अशी शब्दात 

पकडता येत नाही मला

मग सांगायचे सारेच 

राहून जाते….

कुठेतरी कोसळलेला पाऊस

धुक्याची घनगर्द चादर

मत्त वाऱ्याने 

केलेला धुसमुसळेपणा

रात्रीच्या निरव वेळी

मनात उगवलेली चांदणी

मनात वाजलेली

ती शहाणी कडी…..

हे सारं तुला 

सांगताच येत नाही

त्यावेळी मी भरत बसते

तुझ्या माझ्या संवादातल्या 

कित्येक अपूर्ण जागा

व पुन्हा उजळून निघते

माझी तुझ्या अस्तित्वाने काया…..

©®माधवी देवळाणकर

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - कुठल्या बांधावरती
पेरली जातात मौन गाणी
उषेच्या अंतर्मनातील
हळवी तरल उखाणी

जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व पुस्तक प्रेमींना हार्दिक शुभेच्छा!! - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - 

नको नकोसा वाटतो

हा खेळ धूसर सावल्यांचा

एक पाय इथे, एक पाय तिथे

हा प्रवास विस्तवाचा….

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

madhavi nd
Quote by madhavi nd - 

जाईन कधी तरी निघोनी येथुनी
आठवण येईल तुम्हा, होती ती कुणी…

आला क्षण, गेला क्षण घड्याळ टिकटिक करेल 
गुणगुण वारा म्हातारीचा कापूस दूर उडेल…..

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - रुद्र माळा सांब भोळा नाचतो गण होत गोळा सर्वज्ञाती तो त्रिकाळा, भस्म अंगावर जयाच्या
व्याघ्र वसने त्या कटीवर पचवले ज्याने विषाला
 शांत होण्या दाह त्याचा, चंद्र माथ्यावर तयाच्या

अर्धनारी रूप साजे, त्या करी डमरू विलासे
उघडता नेत्रा चराचर, कापते तुझ्या रुपाला
कोरले बाहू त्रिपुंडा, धारले तू चंड मुंडा
ध्यान योगी कालदर्शा, लिंगात्मका हे प्रफुल्ला

अर्धनारी तू महेशा, देव देवांचा असे तू
वाहते गंगा शिरावर,  नांदतो तू पर्वतावर
नाग डोले भोवताली, बैल नंदी वाहनासी
भक्त येती दर्शनाला, गर्जताती जय शंकर

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - शब्दांच्या पलीकडचे...

प्रत्येक वेळी
शब्दात कसे गाता येईल
प्रेमाचे गीत....

डोळे मिटता
उडतात फुलपाखरे
फेर धरून नाचते चांदणे
ऐकू येते लाटांची गाज
दिसते दवाचे अलगद झुलणे

शब्दाच्या पलीकडचे
एक अनाहत गीत
ओठावरून पापणीत
सामावलेली प्रीत
अजून बरेच काही
शब्दात न समावण्यासारखे

बस एवढेच
तुला सांगायचे होते
बाकी काही नाही.....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - अधरांनी अधरांसाठी

द्यावे नक्षत्राचे देणे

अन उधळावे गगनी

चांदण्यांचे लेणे

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - एक ओळ तुझ्यासाठी

आज पुन्हा आठवली 
तुझी मधाळ मिठी
अन मग काय, अख्खा दिवसच
सुगंधी होत गेला
तुझ्या स्पर्शाचा 
अनवट गंध
रेंगाळत राहिला
इथे तिथे, अनावर होऊन
माझ्या संबंध दिवस रात्रीवर 
जाताना तू....
टिपलेले कपाळावरचे
काही बेभान क्षण....
तो स्पर्श, तो गंध
आजही सांभाळला
आपल्यासाठी....
म्हणून प्रिय...
ही एक ओळ तुझ्यासाठी....

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - फिर से तुमने वादा किया

फिर से हमने ऐतबार किया

तेरी इस इक झूठ पर हमने

जिंदगी का सफर तय किया…..

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - विश्वास

शपथा आणाभाका, वचने ह्याची गरज नाही
विश्वासाला कुठल्या पुराव्याची गरज नाही!!धृ!

आठवणींचा एक गुलाब सतत दरवळतो
काय सांगू सखे, तो माझ्या मनात  राहतो
मनाची भाषा दुसऱ्यांना कळणार नाही !!१!!

©®माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
5 likes 0 comments
madhavi nd
Quote by madhavi nd - तुझ्या भेटीशिवाय अनमोल भेट काय मागू
त्या भेटीची ओढ कोणत्या शब्दात  बांधू....

©माधवी देवळाणकर - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes